Shivsena Dasara Melava 2023 | यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? शिवसेना की उध्दव ठाकरे गट?

नवी दिल्ली : Shivsena Dasara Melava 2023 | दसरा मेळावा हा मागील वर्षापासून शिवसेनेच्या ठाकरे गट (Shivsena UBT) आणि शिंदे गटात (CM Eknath Shinde Group) कळीचा मुद्दा झाला आहे. गेल्यावर्षी दसरा मेळाव्याच्या जागेची लढाई न्यायालयात गेली होती. त्यानंतर ठाकरे गटाला शिवाजी पार्कची जागा तर शिंदे गटाला बीकेसीतील जागा (BKC Ground) मिळाली होती. यावेळी सुद्धा दसरा मेळाव्याच्या जागेवरून रस्सीखेच होणार असे दिसत आहे. कारण शिवाजी पार्कच्या जागेसाठी दोन्ही गटांनी महिनाभरापूर्वीच अर्ज केल्याने मुंबई महापालिकेसमोर सुद्धा पेच निर्माण झाला आहे. (Shivsena Dasara Melava 2023)

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर घेण्याची प्रथा सुरू केली होती. ही परंपरा त्यांच्यानंतर सुद्धा अखंडपणे सुरू होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर विचारांचे सोने लुटण्यासाठी बाळासाहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा जागेच्या दाव्यावरून वादग्रस्त ठरत आहे. (Shivsena Sasara Melava 2023)

शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षासह सर्वच गोष्टींवर दावा सांगितल्याने मोठा पेच निर्माण होत आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदा सुद्धा एकनाथ शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या जागेसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. तसेच नेहमी प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी देखील अर्ज केला आहे. दोन्ही गटांनी महिनाभरापूर्वी हे अर्ज केले असल्याने शिवाजी पार्कचे मैदान सभेसाठी कोणाला द्यायचे असा घोळ महापालिकेने गेल्यावर्षीप्रमाणे निर्माण केला आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) या पाश्र्वभूमीवर विधी विभागाकडून अभिप्राय मागितला आहे.
त्यामुळे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी परवानगी कोणाला मिळणार ही उत्सकता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर मेळावा कोण घेणार, हा वाद न्यायालयात गेला होता.
त्यावेळी शिवसेना कोणाची याबाबत निर्णय झालेला नव्हता.
त्यामुळे ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती.
यंदा एकनाथ शिंदे गटाकडे पक्ष आणि चिन्ह असले तरी एकुणच हे प्रकरण न्यायालयात आहे.
त्यामुळे प्रशासनाला दसरा मेळाव्याच्या जागेचा निर्णय घेताना मोठी कायदेशीर कसरत करावी लागणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Pune PMC News | पीएमसी इंजीनियर असोसिएशनच्या वतीने ‘अभियंता दिन सायकल रॅली 2023’ चे आयोजन