‘मनसे’ त जाऊन ‘चूक’ केली, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळासमोर ‘या’ नेत्याच्या ‘उठबशा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकिकडे मनसेच्या झेंडा बदलून पक्षाने कात टाकण्यास सुरुवात केली असतानाच मनसेतून शिवसेनेत परतलेले माजी आमदार शिशिर शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन माफी मागितली. यावेळी त्यांनी मनसेत जाऊन चूक केली, बाळासाहेब मला माफ करा असे म्हणत शिंदे यांनी उठबशा काढल्या. त्यांच्या या कृतीने त्या ठिकाणी उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

शिशिर शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर शिशिर शिंदे हे देखील मनसेमध्ये गेले. त्यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन वर्षापूर्वी त्यांनी मनसे सोडून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिनिमित्त दादर शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन शिशिर शिंदे यांनी क्षमायाचना केली. त्यांनी चक्क कान पकडून स्मृतीस्थळावर शिवसेना प्रमुखांची माफी मागितली. त्यामुळे स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना आश्चर्याचा धक्का बसला.
यावेळी बोलताना शिशिर शिंदे म्हणाले, आजचा दिवस स्फूर्ती देणारा आहे. त्यामुळे झालेल्या चुकांबद्दल माफी मागून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल कान पकडून शिवसेना प्रमुखांची माफी मागितली. तसेच येत्या काळात काम करण्याची प्रेरणा देण्याची प्रर्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like