Shivsena MLA Disqualification Case | ठाकरे गटाच्या आमदाराचा आमदार अपात्रताप्रकरणी खळबळजनक दावा, सर्व निकाल दोन दिवसांपूर्वीच…

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Shivsena MLA Disqualification Case) शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार अपात्रतेचा सर्व निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरलाय. मी हे जबाबदारीने बोलतोय, असे नाईक यांनी म्हटले आहे. (Shivsena MLA Disqualification Case )

माजी मंत्री आणि कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव करून आमदार झालेले वैभव नाईक मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. आजही त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

वैभव नाईक यांनी म्हटले की, दोन दिवसांपूर्वीच सगळा निकाल ठरलाय. मी कामानिमित्त मंत्रालयात आलो होतो, मी हे जबाबदारीने बोलतोय. शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे आमदार मला भेटले. त्यांनी मला सांगितले की, तुम्ही अपात्र होणार. ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार.

वैभव नाईक म्हणाले, उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार हे काही लोकांना आधीपासूनच माहित होते.
सुनील प्रभू पक्ष प्रतोद म्हणून वैध ठरले होते. त्यांचा व्हीप पहिल्यादिवसापासून आम्ही मानतोय.
हे सर्व वेळकाढूपणाचे धोरण होते. निर्णय त्यांना द्यायचा नव्हता.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, म्हणून ते निकाल देत आहेत. आमच्याविरोधात निकाल आहे.
हे मला नाईलाजाने बोलाव लागतय.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | कात्रज परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रवीण येणपुरे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 113 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारामुळे तरुणाने गमावला जीव; दोघांना अटक

Pune Cheating Fraud Case | पुणे : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, बिल्डर सह चार जणांवर FIR

Maharashtra Cabinet Decision | अयोध्येतील प्राणप्रतिष्ठानिमित्त सवलतीच्या दरात ‘आनंदाचा शिधा’, मंत्रिमंडळाने घेतले ९ महत्वाचे निर्णय

Pune Pimpri Chinchwad Crime News | डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न, विश्रांतवाडी परिसरातील घटना; सराईत गुन्हेगार गजाआड