Shivsena MP Sanjay Raut | ”घरचे लग्न असल्यासारखे निमंत्रण पत्रिका वाटत सुटलेत”, राम मंदिरावरून संजय राऊतांची जोरदार टीका

पुणे : Shivsena MP Sanjay Raut | अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम मंदिरात (Ram Temple) प्राणप्रतिष्ठापणा सोहळा असून त्यासाठी जय्यत तयारी सुरूआहे. मात्र, सोहळ्याच्या निमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाने (BJP) विरोधकांना या सोहळ्यातून वगळल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान हा भाजपाचा राजकीय सोहळा असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केली आहे. राऊत आज पुणे दौऱ्यावर असून यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

अयोध्येतील सोहळ्याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले, प्रभू श्रीराम मंदिराचा सोहळा होत असून हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. आम्ही त्यामध्ये बलिदानाच्या समिधा टाकल्या आहेत. हा सांस्कृतिक सोहळा आहे, मात्र भाजपाने त्याचा राजकीय सोहळा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, माझ्या घरच्या लग्नाला यायचे, अशा प्रकारे हे निमंत्रण पत्रिका वाटत सुटलेत. जणू काही राम मंदिराचे यांनी मंगल कार्यालय केले आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, प्रभू श्रीराम सर्व पाहत आहेत. हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही पाहू. असंख्य शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान दिले आहे. त्यामुळे हा संपूर्ण सोहळा होऊन जाऊ द्या, आम्हाला त्यास कोणत्याही प्रकारचा गालबोट लावू द्यायचा नाही. पण आम्ही योग्य वेळ आली की बोलू, असा इशारा राऊत यांनी दिला.