Shivsena Shinde Group | मुख्यमंत्र्यांवर गणपत गायकवाडांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर शिंदे गट आक्रमक, फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

मुंबई : Shivsena Shinde Group | शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) नेत्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर घटनेनंतर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिदे गटाच्या नेत्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन गणपत गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गणपत गायकवाडांनी केलेल्या गंभीर आरोपांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच, गायकवाड यांच्याविरोधात कारवाई करण्याकरता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहितीही देसाई यांनी दिली.

शंभूराज देसाई यांनी म्हटले की, आज मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीत आम्ही गोळीबाराचा विषय मांडला. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यावर जे आरोप केले आहेत ते तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. त्यांनी शिंदेंवर व्यक्तीशः आरोप केले आहेत. भाजपाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, गणपत गायकवाड ज्या जिल्ह्यातून येतात त्याचा मी पालकमंत्री आहे.
या दीड वर्षांत गणपत गायकवाडांनी हा विषय मांडला नाही. समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा झाली नाही.
मुख्यमंत्र्यांवर त्यांनी पहिल्यांदाच आरोप केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | प्राचीन भारताविषयी जागृती करण्यात हेरिटेज सेंटर मोलाची भूमिका बजावेल – नितीनभाई देसाई, ज्येष्ठ उद्योगपती

यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या ( PI, API) बदल्या व नेमणूका

Pune Congress News | पुणे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरुन काँग्रेस भवनमध्ये राडा