Shivsena | नेतृत्त्वानं भेट न घेतल्यानं सेनेचे आमदार नाराज? एकनाथ शिंदेंना साईडलाईन केल्याची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election)  अवघ्या दोन दिवसांवर आली असताना शिवसेनेत (Shivsena) अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत बोलावूनही नेतृत्वानं भेट न घेतल्यानं शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) नाराज असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे.

 

विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेचे (Shivsena) आमदार वेस्ट इन हॉटेलमध्ये (West Inn Hotel) मुक्कामी आहेत. मात्र मुंबईत बोलावूनही नेतृत्त्वानं भेट घेतली नसल्यानं आमदारांमध्ये नाराजी असल्याचं कळतं. विधान परिषदेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली असताना शिवसेनेत समन्वय नसल्याचे पहायला मिळत आहे. याचा फटका शिवसेनेला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

 

शिवसेना आमदारांना रात्री उशिरा फोन करुन मुंबईत दाखल होण्यास सांगितलं गेलं. मात्र मुंबईत आल्यानंतर पक्ष नेतृत्वानं भेट न घेतल्याची भावना आमदारांमध्ये आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आल्याची, निवडणुकीतील घडामोडींपासून त्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेत असल्याचेही बोललं जात आहे.

शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा असल्याबद्दल खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना विचारण्यात आले.
यावर कोणतं नेतृत्व अन् कसले मतभेद? शिवसेनेत असलं काही होत नाही, होणार देखील नाही.
अशी चर्चा करणाऱ्यांना शिवसेनेचं अंतरंग अद्याप समजलेलं नाही, असे राऊत म्हणाले.

 

Web Title :- Shivsena | shiv sena mlas unhappy with leadership ahead of vidhan parishad election minister eknath shinde sideline

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; म्हणाले – ‘मविआचा पत्त्यांचा बंगला राज्यसभेला हलला, विधान परिषदेला कोसळेल’

 

Pune Pimpri Crime | चोर समजून धारदार हत्याराने सपासप वार, खून करणाऱ्या तिघांना अटक

 

Kolhapur ACB Trap On PSI Amit Pandey | 20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात