Shivsena Vinayak Raut On Devendra Fadnavis | शिवसेना खासदार विनायक राऊत यांची जहरी टीका, म्हणाले – ‘फडणवीसांना अडाण्याच्या हाताखाली…’

मुंबई : Shivsena Vinayak Raut On Devendra Fadnavis | शिंदे गट (CM Eknath Shinde Group) आणि भाजपाकडून (BJP) शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न दिवसेंदिवस वाढत चालले असतानाच शिवसेना नेत्यांनीही आक्रमक वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्याच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभात बोलताना राऊत यांची जीभ घसरली आणि त्यांनी बंडखोरांना थेट शिवीच दिली. या जहरी टीकेनंतर एकनाथ शिंदे कोणती प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shivsena Vinayak Raut On Devendra Fadnavis)

खासदार विनायक राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना एकटे पाडायचे आणि शिवसेना नाव पुसून टाकायचे, या भXXX 40 गद्दारांच्या माध्यमातून हीच खरी शिवसेना आहे, असे बिंबवण्याचा त्यांचा उद्देश आहे.
त्यांचा हा डाव उधळून टाकायचा आहे. शिवसेना फक्त बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची आहे,
हे दाखवून देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.

विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले की, महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प
गुजरातला पाठवण्याचे पाप या शिंदे सरकारने केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार आणि अभ्यासू व्यक्तीवर दुर्दैवी वेळ आली आहे.
त्यांना अशा आडण्यांच्या हाताखाली काम करावे लागत आहे.

Web Title :- Shivsena Vinayak Raut On Devendra Fadnavis | a brilliant man like devendra fadnavis has to work under the hands of illiterate elnath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ramdas Kadam | मुंबईतील एकूण शौचालयातून जेवढी घाण निघत नाही तेवढी…, शिवसेना नेत्याची रामदास कदमांवर जहरी टीका

MNS Chief Raj Thackeray | ‘होय… माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे…’, राज ठाकरेंकडून नागपूरची कार्यकारिणी बरखास्त