Video : फोटो शेअर करून मुलाला ‘तैमूर’ बनवायचं नाही : शोएब अख्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सोशल मीडियाद्वारे आपल्याला मूल झाल्याची बातमी सांगितली आहे. शोएबने सांगितले की, तो त्याच्या बाळाचा फोटो शेअर करू इच्छित नाही. आपला मुलगाही तैमूर प्रमाणे लाईमलाईटमध्ये यावा असे त्याला अजिबात वाटत नाही. शोएबची पत्नी रुबाब बेगमने गुरुवारी बाळाला जन्म दिला आहे. आई आणि मुलगा दोघेही निरोगी आहेत.

शोएबने अद्याप आपल्या मुलाचे नाव ठरवले नाही. युट्युबवरून त्याने बाप झाल्याचे सांगितले आहे. व्हिडीओत चाहत्यांना संबोधित करताना शोएब म्हटला की, मी माझ्या मुलाच्या नावाला घेऊन थोडा कन्फ्युज आहे.” त्याने चाहत्यांना त्याच्या मुलासाठी आणि बायकोसाठी प्रार्थना करण्यासाठी सांगितले. शोएबने २०१४ साली रुबाब खान सोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांना ३ वर्षांचा एक मुलगाही आहे त्याचं नाव त्यांनी मोहब्बत मिगेल अली ठेवलं आहे.

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान सोशलवर नेहमीच चर्चेत असतो. चाहत्यांना तैमूरबाबत नेहमीच उत्सुकता असते. त्यामुळे इस्टाग्रामवर तैमूरचे अनेक फॅन पेज आहेत. तैमूरच अनेक फोटो समोर येत असतात आणि व्हायरल होताना दिसतात.

शोएब अख्तरला चाहते रावळपिंडी एक्सप्रेस म्हणूनही ओळखतात. तो एक वेगवान गोलंदाज आहे. अनेक वर्षांपूर्वी निवृत्ती घेतलेला शोएब सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असतो. शोएबचा व्हेरिफाईड युट्युब चॅनलही आहे. त्याचे युट्युबला १ मिलियन सब्सक्राईबर्स आहेत. युट्युबवर शोएब क्रिकेटशी निगडीत अपेडट्स शेअर करत असतो.

आरोग्यविषयक वृत्त

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी