धक्कादायक ! कामाच्या अमिषाने महिलेवर ४ वेळा बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कामाचे अमिष दाखवून ३५ वर्षीय महिलेवर ४ वेळा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

ईश्वर अडवाणी असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.

अडवाणी याचे बोरिवलीत कार्यालय आहे. त्याने या कार्यालयात पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्याने एकदा नव्हे तर महिलेवर ४ वेळा अत्याचार केले आहेत. असा आरोप महिलेने केला आहे. महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अडवाणी याला अटक केली. तर अडवाणी याने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.