धक्कादायक… पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करुन, फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामीची धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आलीआहे. पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य करुन, तिचे विचित्र फोटोसोशल मीडियावर ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत, माहेराहून फॉर्च्युनर गाडी आणण्यासाठी पतीने तगादा लावला. या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B01M6ZGIWM,B073Q3FD8K’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89039cea-b969-11e8-af96-5521eae978df’]

पीडित २४ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. तर पती नणंद आणि सासरे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार ११ मे ते ९ सप्टेंबर २०१८ दरम्यान गोवा आणि राहते घरात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल असलेल्या पतीने पत्नीला गोवा येथे नेले. तिथे तिला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिचे विचित्र फोटो फेसबुक, नातेवाईक तसेच सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या मित्राला ते फोटो पाठवले. या सर्वांनी माहेराहून फॉर्च्युनर गाडी आणावी यासाठी तगादा लावला. नणंद हिने त्यासाठी हाताने मारहाण केली. तसेच तिच्या आई वडिलांना शिवीगाळ केली. तपास पोलीस करत आहेत.

विरोधकांच्या आरोपांमुळे दानवेंचे मानसिक संतुलन बिघडलेय : अशोक चव्हाण