कुख्यात गुन्हेगारांना घेऊन केले गाणे चित्रित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

या गणपतीत मुळशी पॅटर्नमधील आरारारा हे गाणे जबरदस्त हिट ठरले. या गाण्याचे टिजर जेव्हा प्रदर्शित करण्यात आले तेव्हा पहिल्या ११ दिवसात १० लाख लोकांनी ते पाहिले होते. अशा जबरदस्त हिट ठरलेल्या गाण्यात निर्माता, दिग्दर्शकांनी खऱ्या खुऱ्या गुन्हेगारांना नाचविल्याने हा हे गाणे वादग्रस्त ठरू पहात आहे.

जमिनीचे भाव वाढल्याने वर्षानुवर्षे तोट्याची शेती करण्यापेक्षा ती विकून बक्कळ पैसा मिळविण्याचा हव्यास तरुण पिढीला लागला. त्यातून या जमीन खरेदी विक्रीसाठी एजंट म्हणून तरुण पिढी काम करुन लागली. करोडो रुपयांच्या व्यवहारात एकाचवेळी अनेक जण शिरल्याने त्यातून गुन्हेगारीने जन्म घेतला. जास्तीत जास्त व्यवहार आपल्यामार्फतच झाले पाहिजे या इर्षेने दुसऱ्याचा काटा काढला जाऊ लागला. अशा अनेक टोळ्यांनी मुळशीमध्ये जन्म घेतला व त्यांच्या म्होरक्यांनी नंतर पुणे शहरात आश्रय घेतला आहे. शेतकरी, आदिवासी असलेला हा मुळशी तालुका काही वर्षात अचानक गुन्हेगारीचे आगर कसा बनला हे दाखविण्याचा प्रयत्न मुळशी पॅटर्नमधून केल्याचा दावा दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा आहे. मात्र, त्याचवेळी खऱ्या खुऱ्या गुन्हेगारांना चित्रपटातील गाण्यात सहभागी करुन घेतल्याने एक नवा वाद निर्माण होऊ लागला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’98f4d7e8-c6d0-11e8-8889-8701c58d22e8′]

आरा रा रा या गाण्यात तलवारीने केक कापताना जो सीन घेतला आहे तो ही कुख्यात गुन्हेगार अमोल शिंदे याच्या व्हिडिओवरुन प्रेरित आहे. याच टिजरमध्ये राखाडी रंगाचा शर्ट घातलेला विठ्ठल शेलार असून त्यांच्या पाठोपाठ केशरी शर्टमध्ये दिसतो तो अमोल शिंदे आहे.
विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील मुळचा राहणारा असून मारणे टोळीसाठी वसुलीची जबाबदारी त्याच्याकडे आहे. तशी पोलिसांकडे नोंद आहे. त्यातून त्याने मुळशीत दोघांचा खुन केला असून खंडणीसाठी अपहरण करण्याचा गुन्हाही त्याच्या नावावर आहे. ग्रामीण पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. शहर पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने मुळशी येथील दुहेरी खुनाची कबुली दिली होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce815680-c6d0-11e8-af48-bdb77754e776′]

विठ्ठल शेलार याच्यावर २००८ मध्ये सर्व प्रथम हाणामारीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर डेक्कन परिसरात दरोड्याच्या तयारीत असताना २००९ मध्ये त्याला अटकही झाली होती. आॅगस्ट २०१० मध्ये टोळी युद्धातून पिंट्या मारणेचा निर्घुण खुन करण्यात आला होता. त्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१२ मध्ये त्याने प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांचे अपहरण करुन त्यांचा खुन केला व त्यानंतर त्यांचे मृतदेह जाळून टाकले होते. अपहरण आणि खंडणीचा गुन्हाही त्यांच्या २०१३ मध्ये दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7e24058-c6d0-11e8-8a04-7bbb87e303a9′]

या टिजरमध्ये दिसणारा अमोल शिंदे हाही गुन्हेगार असून तो वातूनडे गावात सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आला होता. त्याच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात ३ तर हिंजवडी पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे. पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खून तसेच दरोडा आणि दंगलीचे गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्यातील टोळी युद्धाने मुळशी तालुका बदनाम झाला आहे. त्याची झळ पुणे शहरालाही अनेकदा बसली असून मुळशीची गुन्हेगारी हळूहळू सरकत पुणे शहरात विशेष: कोथरुड परिसरात फोफावली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bcef5a20-c6d0-11e8-8938-79b6601a3ad6′]

मुळचे मुळशीचे आणि आता पुणे शहरासह अनेक ठिकाणी आपली दहशत निर्माण करणाऱ्या अनेक टोळ्या व त्यांचे साथीदार कार्यरत आहेत.
शरद मोहोळ (मुळशी, पुणे शहर)
गजानन मारणे (मुळशी, पुणे शहर)
गणेश मारणे (मुळशी, पुणे शहर)
श्याम दाभाडे (मुळशी, पुणे शहर)
नीलेश घायवळ (मुळशी, पुणे शहर)
बाबा बोडके (पुणे शहर, मुळशी, भोर, वेल्हा)
रोहिदास चोरगे (वेल्हा, पुणे शहर)

यातील शरद मोहोळ याने येरवड्यातील अंडा सेलमध्ये दहशतवादी कातील सिद्धीकी याचा खुन केला होता. तेव्हापासून तो आतच असला तरी त्याच्यावर त्याचे साथीदार हप्ता वसुली करण्याचे काम करत असतात.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c55be074-c6d0-11e8-8669-855401adf7d5′]

जाहिरात