वाकड : चप्पल घेण्याच्या वादातून दुकानाची तोडफोड

पुणे  : पोलिसनामा ऑनलाईन

चप्पल घेण्याच्या किरकोळ वादातून पुण्यातील थेरगाव येथे चार जणांच्या टोळक्याकडून दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना ही घटना रवीवारी (दि.३) रात्री आठच्या सुमारास थेरगावातील सोळा नंबर येथे घडली. याप्रकरणी सय्यद समशेर सज्जाद हुसेन (२६, रा. कसप्टेवस्ती, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास दोन अनोळखी तरुण चप्पल खरेदी करण्यासाठी दुकानात आले होते. त्यांना चप्पल पसंत नसल्याने त्यांनी चप्पल फेकली. चप्पल फेकल्याने सय्यद यांनी त्यांना सुनावले. याच करणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. त्या दोन तरुणांनी आणखी दोन साथीदारांना बोलावत दुकानावर दगडफेक सुरू केली. दुकानाच्या काचा आणि फर्निचरची तोडफोड केली. हा सर्व प्रकार शेजारच्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या तरुणांचा शोध सुरू आहे.

You might also like