20 टक्के कमीशनवर नोटांचे अमिष, बदल्यात चिल्ड्रन बँकेच्या नोटा  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २० टक्के कमिशनवर मंदिर ट्रस्टला २ हजारांच्या नोटांची गरज असल्याचे सांगून एका व्यावसायिकाला खेळण्यातील चिल्ड्रन बँकेच्या नोटा देऊन गंडविणाऱ्या टोळीतील एकाला वडाळा टी.टी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी अशा प्रकारे जोगेश्वरीतील एका व्यापाऱ्यासह मुंबई व परिसरातील अनेकांना गंडा घातल्याचा पोलिसांचा संशय आहे.

इसरार शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे.

इसरार शेखची टोळी मुंबईलतील विविध परिसरात कार्यरत आहे. जोगेश्वरीतील एका दुकानदाराला त्यांनी मंदिराच्या ट्रस्टला मिळालेली दानाची रक्कम खुप जास्त आहे. ते सुटे पैसे एका खोलीत ठेवण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटा हव्या आहेत असे सांगत २० टक्के कमीशन देण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर त्याच्याकडून पैसे तर घेतले परंतु बदल्यात देताना चिल्ड्रन बँकेच्या नोटा दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या पथकाने दीड महिना कसून तपास करत इसरार शेखला अटक केली आहे.