1 जूनपासून हलवाई दुकानांवर देखील लागू होणार मिठाई विकण्याचा ‘हा’ नवा नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया ( FSSAI ) च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आता मिठाईच्या दुकानात शो – केसमध्ये ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर त्याची मॅन्युफॅक्चअरिंग डेट आणि एक्सपायरीची डेट लिहिणे बंधनकारक असेल. दुकानदारांसाठी मिठाई कधी बनविण्यात आली आहे आणि ते किती वेळ खाऊ शकतात हे सांगणे बंधनकारक केले आहे.

1 जून 2020 पासून संपूर्ण देशात नवीन प्रणाली लागू केली जाणार :
ही नवीन प्रणाली 1 जून 2020 पासून संपूर्ण देशात लागू केली जाणार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी मिठाई व्यापाऱ्यांना समुदेशन करतील आणि एफएसएसएआयच्या नवीन मार्गदर्शक सूचनांविषयी त्यांना माहिती देतील. मिठाई व्यापारी पॅक बंद केलेले गोड पदार्थ, मॅन्युफॅक्चरिंग आणि बेस्ट बिफाेर डेट लिहतात.

दरम्यान, स्थानिक बाजारपेठेत, दुधापासून बनवलेल्या मिठाई, दुधाचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ शो केस ट्रेमध्ये विकतात. दुकानदार शो केसमध्ये ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेमध्ये त्याचे दर देखील डिस्प्ले करतात. परंतु मिठाई बनवण्याच्या तारखेविषयी आणि ती किती काळ वापरली जाऊ शकते याबद्दल लिहिले जात नाही. आता नव्या व्यवस्थेअंतर्गत दुकानदारांना शो- केसमध्ये ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर त्याची किंमत व त्यासह बनवण्याची तारीख लिहावी लागेल.