पुण्यातील दुकाने सातही दिवस चालू राहणार, पुणें व्यापारी महासंघाच्या मागणीस अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळा ने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचीआज मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका ,सचिव महेंद्र पितळीया व विपुल अष्टेकर उपस्थित होते .

त्यावेळी झालेल्या चर्चे मध्ये पुण्यातील व्यापाऱ्यांचा P1/ P2 या पद्धतीला तीव्र विरोध असून आम्हाला आता पूर्वीप्रमाणे मुक्त पणे सातही दिवस व्यवसाय करू द्यावा हि आग्रहाची मागणी करण्यात आली त्याला अजितदादांनी सकारात्मक प्रतिसाद देत तेथूनच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री.विक्रमकुमार यांना फोनवर सूचना देऊन आजच त्वरित तसे परिपत्रक काढण्याचे आदेश दिले.त्यानुसार आयुक्तांनीहि आजच तसे आदेश काढले .सणासुदीचा काळ व मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे आनंदाने स्वागत केले आहे .

यावेळी गेल्या पाच दिवसात कर्मचाऱ्यांच्या झालेल्या तपासणी मध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण ३ टक्के पेक्षा कमी असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. व्यापाऱ्यांचा मागणीस पाठिंबा देऊन सहकार्य केल्याबद्दल विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हा अधिकारी नवल किशोर राम,महापालिका आयुक्त विक्रमकुमार,अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांचे महासंघातर्फे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like