Shoulder And Neck Pain | मान आणि खांद्याच्या वेदनांच्या बाबतीत करू नका निष्काळजीपणा, असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा संकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – खांदा किंवा मान दुखणे (Shoulder And Neck Pain) सामान्य आहे. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभवही घेतला असेल. काही वेळाने हे दुखणे आपोआप बरे होईल असे समजून बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. काही लोक मान किंवा खांद्याच्या दुखण्याला चुकीच्या बसण्याची आणि झोपण्याच्या स्थितीशी जोडतात आणि किरकोळ वेदना म्हणून त्याकडे लक्ष देत नाहीत. पण खरे सांगायचे तर वेदनेकडे दुर्लक्ष करणे हे दुखण्याइतकेच हानिकारक आहे (Shoulder And Neck Pain).

 

एखाद्या व्यक्तीची मान आणि खांदे का दुखतात आणि ते कोणत्या प्रकारच्या वैद्यकीय स्थितीचे लक्षण आहे, अशा वेदना कमी करण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत, या बाबत तज्ज्ञांनी काय सांगितले आहे ते जाणून घेवूयात (Shoulder And Neck Pain)…

 

मान आणि खांदेदुखीची सामान्य कारणे (Common Causes Of Neck And Shoulder Pain)
डॉ. सतनाम सिंग छाबरा (Dr. Satnam Singh Chhabra), डायरेक्टर, न्यूरोसर्जरी विभाग, सर गंगा राम हॉस्पिटल, यांनी म्हटले की, खेळांमुळे मुरगळणे, ताण आणि चुकीची मुद्रा ही मान आणि खांदेदुखीची सामान्य कारणे आहेत. गादी, उशी आणि झोपण्याच्या स्थितीचा परिणाम झोपताना माणसाच्या मान, खांद्यावर आणि मणक्यावर किती दबाव पडतो यावर होतो.

 

अतिश्रम, पाठीच्या कण्याला दुखापत आणि संधिवात यामुळे हाडांचे नुकसान झाल्याने देखील कधीकधी खांदे आणि मान दुखते. अशावेळी जड बॅग किंवा पर्स खांद्यावर लटकवू नका.

 

फ्रोझन शोल्डर हे देखील असू शकते कारण (Frozen Shoulder Can Also Be Cause) –
हे देखील या समस्येचे कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामध्ये अनेकांना खांद्यामध्ये भयंकर वेदना होतात. अनेक घरगुती उपाय करूनही आराम मिळत नाही. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

फ्रोझन शोल्डर म्हणजे काय (What Is Frozen Shoulder)
फ्रोझन शोल्डरला अ‍ॅडहेसिव्ह कॅप्सुलिटिस म्हणतात. या स्थितीत खांद्याच्या सांध्यामध्ये मधूनमधून वेदना जाणवते. डॉ. राजेंद्र रेड्डी (Dr. Rajendra Reddy), ऑर्थोपेडिक सल्लागार आणि प्रमुख, ऑर्थोपेडिक्स आणि ट्रॉमा विभाग, नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बंगलोर यांच्या मते, फ्रोझन शोल्डरची समस्या सामान्यतः मधुमेह आणि दुखापतीनंतरच्या रुग्णांमध्ये दिसून येते.

 

या प्रकरणात, सांधे झाकणारी कॅप्सूल जाड आणि कडक होते आणि फुगते, ज्यामुळे फायब्रोसिस होतो, ते म्हणतात. यामुळे, सांध्यात ह्युमरल हेड मूव्हमेंटसाठी जागा कमी होते.

 

तीन टप्प्यांत उद्भवते ही स्थिती (This Condition Occurs In Three Stages ) –
ही वेदनादायक स्थिती हळूहळू विकसित होते आणि तीन टप्प्यांत वाढते. प्रत्येक टप्पा अनेक महिने राहू शकतो, असे डॉक्टर सांगतात. पहिल्या टप्प्यात खांदे हलवताना तीव्र वेदना होतात. दुसर्‍याया टप्प्यात, वेदना कमी होऊ लागतात, परंतु खांदा हलवणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण होते.

 

अनेकदा वस्तू उचलताना आणि खांदा वापरताना त्रास होतो. रात्रीच्या वेळी वेदना वाढू शकते, ज्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो. तिसरा टप्पा थॉईंग स्टेप असते. यामध्ये, बोनी स्पर्स आणि टेंडिनोपॅथी असलेल्या लोकांमध्ये, खांद्यामध्ये तीव्र वेदना होतात, ज्यातून ती व्यक्ती कधीही बरी होऊ शकत नाही.

 

खांदेदुखीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो (Shoulder Pain Can Lead To A Heart Attack) –
डॉ. छाबरा म्हणतात की बहुतेक प्रकरणांमध्ये मान आणि खांदे दुखणे हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
वेदना दीर्घकाळ राहिल्यास, त्याची तपासणी केली पाहिजे. जर तुमची वेदना काही आठवडे सुन्न किंवा आराम न करता कायम राहिली तर,
तुमच्या खांद्यावर सूज आल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे.

 

खांदेदुखीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. डॉ. छाबरा सांगतात की वेदना छातीपर्यंत पसरत असेल आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल,
तर खांद्याच्या दुखण्याचा गांभीर्याने विचार करा. हे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचे लक्षण आहे.

खांद्याचे दुखणे दूर करण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत (What Lifestyle Changes Should Be Made To Relieve Shoulder Pain)

फळे, भाज्या, शेंगा, बिया आणि फॅटी मासे यांसारख्या अँटी-इम्फ्लेमेटरी पदार्थांनी समृद्ध आहार घ्या.
त्यामध्ये प्रोटीओलाइटिक एंजाइम असतात, जे वेदना कमी करू शकतात.

नियमितपणे सक्रिय राहणे आणि शारीरिक हालचाली करणे देखील वेदना होण्याची शक्यता कमी करते.

तज्ज्ञांच्या मते, खांदा आणि मान दुखू नये म्हणून आसन करण्यासोबतच झोपण्याच्या स्थितीकडेही लक्ष दिले पाहिजे.

जर तुम्ही स्वतःच वेदनांसाठी औषधे घेत असाल, परंतु अनेक आठवड्यानंतरही आराम मिळत नसेल, तर तुम्ही डॉक्टरकडे जावे.

खांदे आणि मान दुखणे असह्य आहे. याचा फिरतानाही त्रास होतो.
जर दररोज असे होत असेल तर तुमची जीवनशैली, आहार, झोप आणि बसण्याची मुद्रा याकडे लक्ष दिले पाहिजे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Shoulder And Neck Pain | can neck and shoulder pain be a sign of something serious

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vitamin D Deficiency And Symptoms | शरीरात कमी झाले ‘हे’ व्हिटॅमिन तर गळतात केस, हाडे होतात कमकुवत; तात्काळ खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

 

Obesity | लठ्ठपणामुळे ‘या’ आजारांचा धोका जास्त वाढू शकतो; जाणून घ्या 

 

Tips For Buying Cucumber | काकडी कडू आहे कि गोड असे ओळखा, या टिप्सने तोबडतोब दूर होईल Cucumber चा कडूपणा