धक्कादायक ! मुलगा शौविक पेडलर्सकडून मागवायचा वडील इंद्रजीत चक्रवर्तींसाठी ड्रग्स ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून या कालावधीत अनेक घडामोडी घडल्या आहेत. रोज नवनवीन खुलासे आणि पुरावे समोर येत आहेत. या प्रकरणात आता ड्रग्सचा अँगल समोर आल्यापासूनच रिया आणि तिच्या भावावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोदेखील या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहे. या प्रकरणी एनसीबीने सोमवारी मुंबईत दोन जणांना अटक केली आहे.

एनसीबीने दोघांना अटक करुन त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांचे रिया आणि तिच्या भावाशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहेत. अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्ससोबतचे शौविक चक्रवर्तीचे चॅट्स एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या हाती लागले आहेत. यातून रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती हे देखील ड्रग्स घेत असल्याचे समोर आले आहे.

डॅडीसाठी बूम पाहिजे

एका रिपोर्टनुसार, रियाच्या वडिलांना आपली मुलं ड्रग्स घेतात याबाबत माहिती होते. या चॅटमध्ये शौविक पैडलर्सकडे ड्रग्स मागतो आहे. शौविक विचारतो, भाई कुठे आहेस ? उत्तर येते, घरी आहे. यावर शौविक विचारतो बाबांसाठी बूम पाहिजे आहे. माहिती नव्हते त्यांचा माल संपला आहे. यावर ड्रग्स पेडलर्स सांगतो त्याच्याकडे संपले आहे, उद्यापर्यंत मिळेल.

बॉलीवूडमधील अनेकांचा पेडलरशी संबंध

अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्सच्या चौकशीमध्ये रिया आणि त्या भावा व्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक मोठ्या लोकांची नावे समोर आली आहेत. एनसीबी लवकरच ही नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. संबंधित वृत्तानुसार, वांद्रे, जुहू आणि लोखंडवाला भागांत होणाऱ्या बॉलिवूड पार्टीजमध्ये ड्रग्ज घेतले जाते, असे ड्रग पेडलर्सनी सांगितले. रियावर देखील ड्रग्सचा वापर करणे आणि डलिंग करण्याचा आरोप आहे.