श्रद्धा कपूरचा धक्कादायक निर्णय ; सायना नेहवालच्या बायोपिकमधून एक्झिट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यात सायनाची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने हा बायोपिक अचानक सोडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता मात्र या भूमिकेसाठी कोणाची निवड होणार याची उत्सुकता मात्र वाढल्याचे दिसत आहे.

श्रद्धा कपूर सध्या साहो या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याने सायनाच्या बायोपिकसाठी वेळ देता येणार नाही असे कारण सांगत या चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. श्रद्धाकडे सध्या दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सोबत ‘साहो’ वरुण धवनचा एबीसीडी सीरीजमधील ‘स्ट्रीट डान्सर’ आणि टायगर श्रॉफचा ‘बागी 3’ असे बिग बजेट चित्रपट आहेत. या व्यग्र वेळापत्रकामुळे सायनाच्या बायोपिकला वेळ देता येत नसल्याचं श्रद्धानं सांगितलं आहे. दरम्यान श्रद्धाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

या बायोपिकच्या तयारीसाठी सायना आणि श्रद्धा एकमेकींना भेटल्यासुद्धा होत्या. सायनाच्या भूमिका चांगल्या रीतीने वठवता यावी यासाठी श्रद्धा खूप मेहनतही घेत होती. एवढंच नाही तर सायनाची भूमिका हुबेहूब साकारता यावी यासाठी श्रद्धानं बॅडमिंटनचे धडे घेण्यासही सुरुवात केली होती. यासाठी श्रद्धाचं लूक टेस्टींगही झालं होतं. दरम्यान हा चित्रपट सोडल्यानंतर आता तिची जागा परिणीती चोप्रा घेईल अशी चर्चाही होताना दिसत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us