Shraddha Kapoor Traditional Look | श्रद्धा कपूरनं पारंपारिक पद्धतीने साजरा केला गुढीपाडवा, पाहा व्हायरल फोटो..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shraddha Kapoor | काल मराठी नवीन वर्षाला (Marathi New Year) प्रारंभ झाला. तसेच राज्यभरात गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) मोठ्या उत्साहात पार पडला. अखेर दोन वर्षानंतर राज्यात निर्बंधयुक्त गुडीपाडवा साजरा करण्यात आला. तसेच अनेक मराठी कलाकारांसह हिंदी सिनेसष्टीमधल्या अनेक कलाकारांनी (Shraddha Kapoor Traditional Look) नव्या वर्षाच स्वागत केलं आहे. तर अभिनेत्री श्रद्धा कपूरनं (Shraddha Kapoor Traditional Look) सुद्धा आपल्या घरी गुढी पाडवा पारंपारिक पद्धतीनं साजरा केला.

 

सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर श्रद्धा कपूरनं काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं पारंपारिक लूक केला आहे. तिनं पिवळ्या आणि निळ्या रंगाची काठपदराची नऊवारी साडी (Shraddha Kapoor Nauvari Look) नेसली आहे. तसेच फोटोखाली (Shraddha Kapoor Saree Photo) कॅप्शनमध्ये तिनं ‘नव्या संकंल्पानी करुया नववर्षाचा शुभारंभ, गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !’ असं लिहून नेटकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रद्धाचा हा मराठमोळा लूक (Shraddha Kapoor Traditional Look) नेटकऱ्याना चांगलाच भावला आहे. तसेच जवळपास 24.48 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स देऊन प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी तिच्या या फोटोवर कमेंट करून कौतुकाचा भरपूर पाऊस पाडला आहे.

दरम्यान, श्रद्धाची आई मुळची (Shivangi Kolhapure) महाराष्ट्रीयन असल्यानं तिच्यासाठी हा सण अत्यंत खास असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती आपल्या बोल्ड (Shraddha Kapoor Bold Photos) आणि क्यूट फोटोनं (Shraddha Kapoor Cute Pics) चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे इंस्टाग्रामवर एकूण 70.5 इकते फॉलोवर्स (Shraddha Kapoor Instagram Followers) आहे.

 

Web Title :- Shraddha Kapoor Traditional Look | shraddha kapoor celebrates gudi padwa in traditional style wishes fans on the marathi new year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा