Pune : श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवे यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे 9 वे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा यांचे कोरोनामुळे मंगळवारी (दि.20) निधन झाले. ते पुण्यात वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावली. कोरोनाशी सुरु असलेली झुंज अखेर आज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले. श्रीमंत महेेंद्र पेशवे हे महाराष्ट्रातील राजघराण्यांना एकत्र आणत स्थापन करण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना महेंद्र पेशवे यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. कोरोनाचा धुमाकूळ सुरू असून संपूर्ण आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. सुविधांअभावी होणाऱ्या मृत्यूंसंख्येतही वाढ होऊ लागली आहे.