3 भाजपा नेत्यांच्या हत्येचा मास्टरमाईंड ‘ठार’, 72 तासात लष्करानं दहशतवाद्याचा केला ‘खात्मा’

ADV

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशनमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा चीफ कमांडर सैफुल्ला यास ठार केले. सैफुल्ला यास रियाज नायकूला मारल्यानंतर हिजबुलने चीफ कमांडर बनवले होते.

माहितीनुसार, सैफुल्ला यास श्रीनगर जिल्ह्याच्या रंगरेत परिसरात झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले. त्याच्या एका साथीदाराला लष्कराने जिवंत पकडले आहे. सैफुल्ला यास याच वर्षी हिजबुलने आपला चीफ बनवले होते. रंगरेतमध्ये लष्कराचे सर्च ऑपरेशन जारी आहे.

ADV

जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंह यांच्यानुसार काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या तीन कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येच्या पाठीमागे सैफुल्लाचाच हात होता. भाजपा नेत्यांच्या हत्येत सहभागी दहशतवादी अब्बास हिजबुलमधूनच लश्करमध्ये गेला होता. लष्कराने 72 तासांच्या आत भाजपा नेत्यांच्या मारेकर्‍याला ठार केले आहे.

तर, जम्मू काश्मीर पोलीसचे आयजी विजय कुमार यांनी आजतकशी बोलताना भाजपा नेत्यांच्या हत्येच्या पाठीमागे सैफुल्लाचा हात होत असल्याच्या वृत्ताला नाकारत म्हटले की, त्या घटनेच्या पाठीमागे दहशतवादी संघटना लश्कर ए तैयब्बाचा हात होता. त्यांनी सैफुल्ला मारला जाणे यास मोठे यश म्हटले आहे आणि म्हटले की, आम्ही त्या दहशतवाद्यांच्या शोधात आहोत, ज्यांचा भाजपा नेत्यांच्या हत्येपाठीमागे हात होता.

या चकमकीत एका दहशतवाद्याला जिवंत पकडल्याचे सुद्धा वृत्त होते, परंतु आयजी विजय कुमार यांनी कुणाही दहतवाद्याला पकड्याच्या वृत्तालाही नकार दिला आणि म्हटले की, कोणत्याही दहशतवाद्याला पकडलेले नाही. सुरक्षा दलांचे ऑपरेशन जारी आहे. रंगरेत परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली आहे.