डॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जावई व स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर (दीदी) यांचे यजमान डॉ. श्रीनिवास तळवलकर (वय 72) यांचे सोमवारी (दि.18) अहमदाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. 19) सायंकाळी ठाण्यातील तत्वज्ञान विद्यापीठात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनामुळे कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या निधनाने स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे.

डॉ. तळवलकर अहमदाबाद येथे कामानिमित्त गेले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारसाठी मंगळवारी तत्वज्ञान विद्यापीठात आणण्यात आले. डॉ. श्रीनिवास हे प्रिटिंग व्यवसायात कार्यरत होते. स्वाध्याय परिवाराचे वैश्विक कार्य सांभाळणाऱ्या धनश्री दीदींना त्यांनी मोलाची अन खंबीर साथ दिली. हिंदू कॉलनीतील तळवलकर तसेच रहेजा इस्पितळाचे संस्थापक सदस्य असलेले कै. डॉ. नीळकंठ तळवलकर यांचे ते सुपूत्र होते.