PM Narendra Modi | PM नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाला सुरूवात ! शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक करत म्हणाले – ‘डबल-इंजिन सरकार…’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक केले. तसेच भाजप काळात महाराष्ट्राला मंजूर झालेल्या प्रकल्पांचा उल्लेख केला. डबल इंजिन सरकार वेगाने काम करत असल्याचे ही मोदी म्हणाले. नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीत करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. तसेच विकासकामांचे उद्धाटन करताना आपल्या आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

भाषणाची सुरुवात मराठीत करत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, “आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतंही शुभकाम करताना आपण प्रथम गणेशपूजन करतो. आज नागपुरात असल्याने टेकडीच्या गणपती बाप्पाला माझं वंदन.” आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ तारका उदयाला येत आहेत. हे महानक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा आणि ऊर्जा देईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

 

पुढे महाराष्ट्रासाठी नव्याने मंजूर झालेल्या प्रकल्पांबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “स्वातंत्र्याला ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवात ७५ हजार कोटींच्या या विकासकामांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन. आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करत असल्याचे दर्शवत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण अनेक जिल्ह्यांना हा महामार्ग जोडत आहे. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना याचा मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.”

पायाभूत सुविधा म्हणजे फक्त निर्जीव रस्ते आणि उड्डाणपूल नसतात. सध्याचे सरकार पायाभूत सुविधांना मानवी स्पर्श देत असल्याचे ही नरेंद्र मोदी म्हणाले. त्यानुसार गरिबांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्यमान भारत योजना असेल किंवा जन धन योजना असेल या योजना सुद्धा पायाभूत सुविधांचे उदाहरण असल्याचे मोदी म्हणाले.

 

यावेळी गोसेखूर्द नरेंद्र मोदींनी प्रकल्पाचे उहाहरण दिले. ते म्हणाले, “या धरणाचं भूमीपूजन ३०-३५ वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यावेळी अपेक्षित खर्च ४०० कोटींचा होता. पण विलंबामुळे गोसेखूर्द प्रकल्पाचा अंदाजे खर्च ४०० कोटींहून वाढून १८ हजार कोटींवर गेला. २०१७ मध्ये डबल इंजिन सरकार आल्यानंतर या धरणाचे काम वेगाने सुरु झाले. सर्व समस्या सोडवण्यात आल्या आहेत. हे धरण या वर्षी पूर्ण भरले याचा आनंद आहे. यासाठी तीन दशकांहून अधिकचा काळ लागला. त्यानंतर शेतकरी, गावांना याचा लाभ मिळत आहे.” पुढे त्यांनी त्यांच्या सरकारचे ध्येय सर्वांसमोर मांडले. “आम्ही ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास, सबका प्रयास’ यावर जोर देत आहोत. मी जेव्हा सबका प्रयास म्हणतो तेव्हा त्यात प्रत्येक नागरिक आणि राज्य सहभागी आहे. जेव्हा छोटे, मोठे सर्वांची ताकद वाढेल, तेव्हाच भारताचा विकास होईल. त्यामुळे वंचित राहिलेल्यांना, ज्यांना छोटे समजण्यात आले त्यांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत,” असे मोदींनी सांगितले.

 

पुढे त्यांनी देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला शॉर्टकट राजकारणापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.
करदात्यांवर भरपूर कर लादून देशाचा दीर्घकाळ विकास होऊ शकत नाही असे ते म्हणले.
करदात्यांवर अतिरेकी कर लढणे हा राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसे लुटण्याचा प्रकार आहे, ही एक विकृती आहे.
असा शॉर्टकट घेणारे राजकीय पक्ष, नेते देशातील प्रत्येक करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत.
सत्तेत येणं हाच यांचा हेतू असतो. खोटी आश्वासने देऊन सरकार हिसकावून घेण्याचा हेतू असणारे
कधीही देश निर्मिती करु शकत नाहीत, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.

देशाच्या प्रगतीसाठी स्थिर विकासदर आणि दूरदृष्टी गरजेची आहे, भारत पुढील २५ वर्षांचे धोरण समोर ठेवून काम करत
असताना काही पक्ष आपल्या स्वार्थासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जगात पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आपण त्याचा फायदा घेऊ शकलो नाही.
दुसऱ्या आण तिसऱ्या वेळीही आपण मागे होतो. पण आज जगात चौथी औद्योगिक क्रांतीची वेळ आली आहे,
तेव्हा भारती ती संधी गमावू शकत नाही. अशी संधी देशाला वारंवार मिळत नाही,
शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही, असेही ते म्हणाले.

 

Web Title :- PM Narendra Modi | pm narendra modi inaguarates nagpur samruddhi highway maharashtra government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parineeti Chopra | अभिनेत्री परिणीती चोप्राने सांगितले तिच्या अपयशामागील कारण; म्हणाली “स्वप्नातही वाटले नव्हते… “

CM Eknath Shinde | ‘हा प्रकल्प होऊ नये म्हणून बैठका झाल्या’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

NPS Calculator | NPS मध्ये 15 हजार रुपये गुंतवा, 2.23 लाख रुपये दर महिना मिळेल पेन्शन, जाणून घ्या कॅलक्युलेशन