Shubman Gill | शुभमन गिलने शतकी खेळी करत ‘हे’ विक्रम केले आपल्या नावावर; दिग्गजांनाही टाकले मागे

0
839
Shubman Gill | shubman gill cricket record shubman gill holds many records india vs new zealand
file photo

पोलीसनामा ऑनलाईन : Shubman Gill | काल पार पडलेल्या इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या T-20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने हि मालिका 2-1 ने जिंकली. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) अप्रतिम खेळ करत आपले शतक साजरे केले. हे शतक झळकावून गिलने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.

शुभमन गिलची तुफान खेळी

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या T-20 सामन्यात शुभमन गिलने 63 चेंडूत 126 धावा केल्या. यामध्ये 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंड समोर 234 धावांचे तगडे आव्हान ठेवले होते.

शुभमन गिलचा दिग्गजांच्या यादीत समावेश

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल (Shubman Gill) हा भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. गिलने बांग्लादेशविरुद्ध कसोटी शतक, श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय शतक आणि न्यूझीलंडविरुद्ध T-20 शतक झळकावले आहे.

अशी कामगिरी करणारा 7 वा भारतीय फलंदाज

T20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल टीम इंडियाचा सातवा फलंदाज ठरला आहे. गिलच्या अगोदर T20 क्रिकेटमध्ये भारताकडून सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दीपक हुडा, सुरेश रैना यांनी शतक केले आहे. T20 क्रिकेटमध्ये भारताकडून रोहित शर्माने चार शतके झळकावली आहेत.

विराट कोहलीला टाकले मागे

शुभमन गिल याने न्यूझीलंडविरुद्ध 126 धावांची खेळी करत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याला देखील मागे टाकले आहे. T20 क्रिकेटमध्ये भारताकडून वैयक्तिक सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
याअगोदर हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. आशिया कप 2022 मध्ये विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध 122 धावांची केली होती.

‘या’ 20 खेळाडूंनी तिनही फॉरमॅटमध्ये झळकावलं शतक

भारतासह जगात एकूण 20 खेळाडूंनी तिनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. भारताकडून सुरेश रैना,
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतक झळकावले आहे.
तसेच भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त जागतिक क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेल, शेन वॉटसन, केविन ओब्रायन,
ब्रेंडन मॅक्युलम, फाफ डू प्लेसिस, ख्रिस गेल, अहमद शहजाद, मार्टिन गुप्टिल, तिलकरत्ने दिलशान,
मोहम्मद रिझवान, डेव्हिन मलान, तमीम इक्बाल, जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर आणि महेला जयवर्धने यांनी
तिन्ही फॉरमॅट मध्ये आपल्या देशाकडून शतक झळकावले आहे.

Web Title :- Shubman Gill | shubman gill cricket record shubman gill holds many records india vs new zealand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai ACB Trap | 15 लाख रुपये लाच घेताना वस्त्रउद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar On Pune Police | पुणे पोलिसांच्या ‘त्या’ निर्णयावर अजित पवारांची टीका; म्हणाले – ‘
…तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नयेत’ (VIDEO)

Chinchwad Bypoll Elections | अजित पवारांनी मुलाखत घेण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याने विकत घेतले नामिर्देश पत्र, राजकीय चर्चांना उधाण