Shweta Tiwari | श्वेता तिवारीने पुन्हा केले रिव्हिलिंग फोटोशूट; शेअर केला काळ्या साडीमधील ग्लॅमरस लूक

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या वयाचा अंदाज लावणे अवघड आहे. त्यापैकीच छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. (Shweta Tiwari) श्वेताच्या सौंदर्यावरुन तिने चाळीशी पार केली आहे असे कोणालाही वाटत नाही. दिवसेंदिवस अधिक हॉट होत चाललेल्या श्वेता तिवारी हिने आणखी एक हॉट फोटोशुट केले आहे. काळ्या रंगाच्या साडीमधील काही हॉट फोटो तिने (Shweta Tiwari) ऑफिशियल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी ही मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्वेताची ओळख देशभर असून तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. श्वेता तिवारी सोशल मीडियावर आपले अनेक रिव्हिलिंग फोटो (Shweta Tiwari Revealing Photo) सातत्याने शेअर करत असते. श्वेताच्या अभियानाचा व या वयातील सौंदर्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने नुकतेच नवीन फोटोशूट केले असून यामधील फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) पोस्ट केलेल्या या नव्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगांची सिक्वेल साडी नेसली आहे.
त्या बरोबर रिव्हिलिंग असा काळ्या रंगांचाच सिक्वेल ब्लाऊज परिधान केला आहे.
या लूकमध्ये तिने सिल्व्हर ज्वेलरी घातली असून केस मोकळे सोडले आहेत.
श्वेता तिवारीने या नव्या साडी फोटोशुटमध्ये सुपर ग्लॅमरस लूक कॅरी केला आहे. श्वेताच्या या कातील लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.
अनेकांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. (Shweta Tiwari Bold Photo) एवढे वय असतानाही अभिनेत्री श्वेताची फिगर आणि
फिटनेस बघून तिचे कौतुक केले. त्याचबरोबर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, श्वेताकडे पाहून कोणी म्हणणार नाही की तिला 22 वर्षांची मुलगी आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, तुमची मुलगी आणि तुमचं वय सारखंच दिसतं. श्वेता व पलक या आई-मुलीसारखे न दिसता बहिणींसारख्या दिसतात.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिची ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील भूमिका खूप गाजली. या भूमिकेमुळे तिची लोकप्रियता वाढली. याचबरोबर ती सलमान खानच्या (Salman Khan) ‘बीग बॉस सीजन 4’ (Bigg Boss Season 4) मध्ये सहभागी झाली होती. 2011 साली तिने बीग बॉसची ट्रॉफी जिंकली होती. अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे (Shweta Tiwari Hot Photo) कायम चर्चेत असते. या आधी तिने बाथरुममध्ये शॉवर खाली फोटोशूट केले होते. यावेळी तिने हॉट फोटो अपलोड केले होते. आता पुन्हा एकदा तिच्या साडीतील फोटोमुळे ती चर्चेत आली आहे.

Web Title :  Shweta Tiwari | shweta tiwari draped in black saree looks sizzling fans commenting over pictures

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress Protest Against BJP Govt | काँग्रेसचे भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन ! ‘भाजप’ वॉशिंग मशीन, ‘मोदी’ वाशिंग पावडर

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे बनले?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; म्हणाले…

Satara Crime News | धक्कादायक! जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् 15 मिनिटानंतर बाप-लेकाचा मृत्यू

Uddhav Thackeray | ‘मर्दाची औलाद असाल तर या सरकारी यंत्रणा…’, उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान (व्हिडिओ)