Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारीच्या ब्लॅक अन्ड व्हाईट फोटोशूटने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन – हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिच्या अदांनी आजही प्रेक्षक घायाळ होत असतात. श्वेताने अनेक वर्षे मालिकाविश्वामध्ये काम केले असल्याने तिची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. घराघरात श्वेता तिवारीची लोकप्रियता असून आपल्या हॉट फोटोशूटने (Shweta Tiwari Hot Photoshoot) ती सोशल मीडियावर आग लावत असते. अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही अभिनयाबरोबरच तिच्या कातील अदांसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असून तिचे इंस्टाग्रामवर 4.9 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. श्वेता तिवारी ही नेहमी तिचे रिव्हिलिंग फोटोशूट (Shweta Tiwari Revealing Photoshoot) चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अनेक वर्षे मनोरंजन विश्व गाजवले आहे. 42 वर्षीय श्वेता आजही आपल्या खास अंदाजमध्ये चाहत्यांना अवाक करते. तिचे फोटो आणि व्हिडिओ (Shweta Tiwari Video) हे नेहमी चर्चेचा विषय बनत असतात. यावेळी देखील श्वेताने फॉर्मल लूकमध्ये काही ब्लॅक अन्ड व्हाईट फोटो इंस्टग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने ब्लॅक कलरची पॅन्ट आणि फॉर्मल जॅकेट स्टाईल केले आहे. तसेच सोबत व्हाईट कलरचा क्रॉप टॉप स्टाईल केला आहे. यावेळी तिने केस मोकळे सोडले असून कॅमेऱ्यामध्ये आकर्षक पोज दिल्या आहेत. अभिनेत्री श्वेता तिवारीच्या या फोटोखाली चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून या वयामध्ये असणाऱ्या तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. अनेक चाहत्यांनी तिला रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivali Parab | शिवाली परबचे नवीन रोमॅंटिक गाणे झाले रिलीज; शिवालीने शेअर केला हा वेगळा अनुभव

ACB Trap News | 70 हजारांची लाच घेताना सहकारी संस्थेचा लिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Weight Lose | अवघ्या ७ दिवसात ३-४ किलो वजन कमी करायचंय का? फॉलो करा हा ‘डाएट प्लान’, वितळून बाहेर पडेल चरबी