Weight Lose | अवघ्या ७ दिवसात ३-४ किलो वजन कमी करायचंय का? फॉलो करा हा ‘डाएट प्लान’, वितळून बाहेर पडेल चरबी

नवी दिल्ली : वजन कमी (Weight Lose) करण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात पण यश येत नाही. तुम्ही सुद्धा असे प्रयत्न करून थकला असाल तर एक डाएट प्लॅन (Diet Plan) जाणून घेऊया ज्याचे पालन करून ७ दिवसांत ३ ते ४ किलो वजन कमी करता येते. ७ दिवसात वजन कमी (Weight Lose) करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते पाहुया (How to lose weight in 7 days).

१. मसूर डाळ (Lentils) –
टीओआयच्या बातमीनुसार, जर ७ दिवसात ३ किलोपर्यंत वजन कमी करायचे असेल, तर रोजच्या डाएट प्लॅनमध्ये मसूर डाळीचा समावेश करा. सूप सुद्धा बनवून पिऊ शकता. यातील फायबर हळूहळू कार्बोहायड्रेट्स शोषून घेते. वजन कमी करण्यासाठी, कार्बोहायड्रेट्स मर्यादित करणे फार महत्वाचे आहे.

२. बदाम (Almonds) –
बदाममधील अमिनो अ‍ॅसिड आणि एल-आर्जिनिन फॅट आणि कार्बोहायड्रेट झपाट्याने पचवतात. जर्नल ऑफ इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशननुसार, जिममध्ये जाण्यापूर्वी भिजवलेले बदाम खाल्ल्याने फॅट लवकर बर्न होते.

३. स्प्राउट्स (Sprouts) –
स्प्राउट्समध्ये प्रोटीन, फायबर असल्याने व्यायामादरम्यान शक्ती मिळते, आणि फॅट जलद बर्न होते. पचनशक्ती वाढल्याने मेटाबोलिज्म वाढते. (Weight Lose)

४. राजगिरा (Amaranth) –
राजगिरा ग्लुटेन मुक्त असून यामध्ये भरपूर प्रोटीन असते, जे शरीरात दिवसभर टिकते. राजगिरा वजन कमी करण्यासाठी इंधन म्हणून काम करते. राजगिरा सकाळी लवकर खाल्ल्याने दिवसभर भूक लागत नाही.

५. ब्रोकोली (Broccoli) –
ब्रोकोलीमध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. ब्रोकोली खाल्ल्याने चरबी जलद वितळते.
वजन कमी होते. ब्रोकोली सूप बनवून पिऊ शकता.

६. एक्सरसाइज (Exercise) –
वजन कमी करणारे डाएट तोपर्यंत यशस्वी होत नाही जोपर्यंत तुम्ही डाएटसोबत एक्सरसाइज करत नाही.
यासाठी रोज ४५ मिनिटे ते एक तास एक्सरसाइज करा. यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. ब्रिक्स एक्सरसाइज करा.
जलद वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, जंपिंग इत्यादी करू शकता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 70 हजारांची लाच घेताना सहकारी संस्थेचा लिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात