Side Effect Of Guava | या लोकांनी चुकून सुद्धा खाऊ नयेत पेरू, फायद्याऐवजी होईल नुकसान

नवी दिल्ली : पावसाळा आणि हिवाळ्यात पेरू (Side Effect Of Guava) मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. पेरू बहुतेकांना आवडतात. पेरूची चव गोड आणि तुरट असते. काळे मीठ लावून खाल्ल्याने त्याची चव आणखी वाढते. त्यात सोडियम, पोटॅशियम, फायबर, प्रोटीन, आयर्न आणि व्हिटॅमिन सी (Sodium, Potassium, Fiber, Protein, Iron and Vitamin C) इत्यादी पोषक घटक असतात. यामुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. कमजोरी दूर होते. परंतु, काही लोकांनी पेरूचे (Side Effect Of Guava) सेवन टाळले पाहिजे. पेरूचे सेवन कोणी करू नये? ते जाणून घेऊया (Disadvantages Of Eating Guava Fruit).

हायपोग्लाइसेमियाच्या समस्यामध्ये
ब्लड शुगर (Blood Sugar) लेव्हल कमी असलेल्या लोकांनी पेरूचे सेवन टाळावे. पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) खूपच कमी असतो, म्हणून तो डायबिटीज रुग्णांसाठी चांगला मानला जातो.

डायरियाच्या समस्यामध्ये
डायरियाची (Diarrhea) समस्या असेल तर पेरूचे सेवन करू नये. कारण पेरूतील फायबरमुळे डायरियाची समस्या वाढू शकते. बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर बिनधास्त खाऊ शकता.

दातदुखी असेल तर
पेरूमधील बिया चावणे खूप कठीण जाते. या कारणामुळे तो खाल्ल्याने दातदुखीची समस्या वाढू शकते. याच्या बिया आकाराने लहान असतात, त्या दातांमध्ये अडकतात. त्या काढण्याच्या प्रयत्नात दातदुखीची समस्या सुरू होऊ शकते. (Side Effect Of Guava)

पोट फुगण्याच्या समस्येमध्ये
ज्यांना अन्न उशीरा पचते, त्यांनी पेरूचे सेवन अजिबात करू नये. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्रक्टोज असल्याने
तो पचवणे त्रासदायक ठरते. अशा लोकांनी पेरू खाणे टाळावे.

सर्जरी
सर्जरीनंतर पेरू खाऊ नये. शस्त्रक्रियेनंतर याचे सेवन केल्याने जखमा भरण्यास त्रास होतो. शस्त्रक्रियेपूर्वीच पेरू खाणे बंद
केले पाहिजे कारण असे केल्याने रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते.

वरील लोकांनी पेरू खाणे टाळले पाहिजे. मात्र, डॉक्टरांना विचारून त्याचे सेवन करू शकता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News |  50 हजार रुपये लाच घेताना पुण्यातील महावितरणचा सहायक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात