Side Effects Of Oranges | हिवाळ्यात ‘या’ 5 लोकांनी चुकूनही खाऊ नका संत्री, नाहीतर होईल गंभीर परिणाम…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | थंडीचा सिझन चालू झाला आहे (Side Effects Of Oranges). हिवाळ्यामध्ये बाजारपेठ अनेक भाज्या आणि फळांनी भरलेली असते. फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. तसेच फळे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. हिवाळा म्हटलं की सर्वप्रथम आठवते ते फळ म्हणजे संत्री होय. संत्री शिवाय हिवाळा ऋतू अपूर्ण आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय संत्री प्रथिने (Protein), कार्बोहायड्रेट (Carbohydrate), फायबर (Fiber), सोडियम (Sodium), पोटॅशियम (Potassium), कॅल्शियम (Calcium) आणि फॉस्फरसचा (Phosphorous) चांगला स्रोत आहे (Side Effects Of Oranges).

हिवाळ्यात अनेकांना प्रश्न पडतो की थंड वातावरणात संत्री खावे की नाही? हिवाळ्यात जास्त संत्री खाल्याने नुकसान होऊ शकतं. जाणून घेऊया कोणत्‍या लोकांसाठी संत्र्याचे अतिसेवन करणे खूप हानिकारक ठरू शकते.

यकृत संबंधित आजार असलेले (Liver Problem) –

यकृताशी संबंधित आजार असलेल्यांनी संत्र्याचे जास्त प्रमाणात सेवन टाळावे. कारण संत्र्यामध्ये पोटॅशियम (Potassium) भरपूर प्रमाणात असते. यासोबतच संत्र्याचा किडनीवरही परिणाम होतो.

दातांच्या समस्या (Dental Problem) –

ज्या लोकांना दातांसंबंधी समस्या आहेत, त्यांनी जास्त संत्री खाणे टाळावे. संत्र्याचे जास्त सेवन केल्याने दातांचे नुकसान होते. त्यात एक आम्ल असते जे दातांमध्ये कॅल्शियम (Calcium) सोबत बॅक्टेरियाचा सुद्धा संसर्ग होऊ शकतो.

आम्लपित्त असणारे (Bile Acid) –

संत्र्याचे जास्त सेवन केल्याने आम्लपित्त आणि छातीत जळजळ (Heart Burn) होऊ शकते. संत्र्यामध्ये एसिड असते ज्यामुळे शरीरातील एसिडची पातळी (Acid Level In Body) वाढते. संत्र्याचे सेवन नेहमी मर्यादित प्रमाणात करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच करा.

सांधेदुखी (Joint Pain) –

सांधेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी संत्र्याचे जास्त सेवन टाळावे. संत्र्यामध्ये कूलिंग इफेक्ट आहे, ज्यामुळे सांधेदुखी आणखी वाढू शकते.

सिट्रस ऍलर्जी (Citrus Allergy) –

संत्री हे आंबट फळ आहे. अनेकांना आंबट फळे आवडत नाहीत . तसेच आंबट फळांचे सेवन केल्यास त्यांना पोटाशी (Stomach Problems) संबंधित आजार होतात. सायट्रीक एसिड (Citric Acid) असलेल्या फळांमुळे ऍलर्जी होते.
त्याचबरोबर संत्री खाल्ल्याने सुद्धा ही एलर्जी वाढू शकते (Side Effects Of Oranges).

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हिवाळ्यात वाढत्या कोंड्यामुळे तुम्हीही झाले हैराण? करा काही सोपे घरगुती उपाय….

पुण्यातील नवले ब्रिजवर रिक्षाची ट्रॅव्हल्सला धडक, एकाचा मृत्यू

सकाळी अनोशापोटी कच्चा लसूण खाल्याने होतात जबरदस्त फायदे…