उद्या पुण्यामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने महा मूकमोर्चा

दौंड : अब्बास शेख

मुस्लिम समाजाला आरक्षण, संरक्षण मिळावे त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि हल्ल्यांविरोधात ऍट्रोसिटी सारखा कडक कायदा अमलात आणावा अश्या विविध मागण्यांसाठी उद्या ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुस्लिम महा मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महा मुकमोर्चा पुण्यातील गोळीबार मैदान ते कौन्सिल हॉल असा प्रवास करणार आहे. यावेळी कुठलीही घोषणाबाजी करण्यात येणार नये हा मोर्चा पूर्णपणे शांततेत आपला प्रवास करणार आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8af43767-b326-11e8-b3f9-1962936e17e8′]

या महा मुकमोर्चासाठी मुस्लिम समाजातील सर्व नागरिक, कर्मचारी वर्ग, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, महिला व मुस्लिम समुदायातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनाकडून कळवण्यात आले आहे.

मुस्लिम समाजाच्या भविष्यासाठी , रक्षणासाठी , सुडाचे राजकारण करणाऱ्या विरुद्ध हा महा मूकमोर्चा निघणार असून हा मोर्चा पक्षविरहित आणि संघटना विरहित राहणार आहे व तो कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काढला जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

‘बेटी बचाव बेटी पढाव’ नाही भाजपा वालो से बेटी बचाव :अशोक चव्हाण