Homeताज्या बातम्याSIM Cards New Rule | सिम कार्डबाबत नवा नियम जारी ! आपल्याकडे...

SIM Cards New Rule | सिम कार्डबाबत नवा नियम जारी ! आपल्याकडे जादा सिम कार्ड आहेत का? तर मग ‘हे’ अनिवार्य असणार; जाणून घ्या

दिल्ली : वृत्तसंस्था – SIM Cards New Rule | भारतीय दुरसंचार विभागाकडून (Department of Telecommunications, India) सिम कार्डबाबत (SIM cards) एक नवीन नियमावली जारी (SIM Cards New Rule) करण्यात आली आहे. हा नियम 7 डिसेंबर 2021 पासून भारतात लागू झाला आहे. ज्यामध्ये आता अधिक सिम कार्ड ठेवण्याची सवलत बंद केली गेली आहे. यानूसार 9 पेक्षा अधिक सिम ठेवणाऱ्या वापरकर्त्याला सिम कार्डचे व्हेरिफिफिकेशन (Verification) करणे अनिवार्य असणार आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे सिम कार्ड बंद करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, दूरसंचार विभागाने (DoT) ऑनलाइन फ्रॉड, आपत्तीजनक कॉलसह वाईट घटना थांबवण्यासाठी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. फेक सिम कार्ड (SIM Cards New Rule) रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

30 दिवसात सिम बंद होणार –
दुरसंचार विभागाने (DoT) सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सला (Telecom operators) आदेश दिला आहे. ज्या यूजर्सकडे 9 पेक्षा जादा सिम कार्ड आहेत. त्यांना सुचना दिली जाईल. सर्व सिम कार्डची आउटगोइंग कॉल 30 दिवसात बंद केले जाईल. तर इनकमिंग कॉल 45 दिवसाच्या आत बंद करण्याचा आदेश देण्यात येणार आहे. मोबाइल सिम यूजर्सकडे एक्स्ट्रा सिम सरेंडर करण्याचा ऑप्शनही आहे. जर सब्सक्राइबर्सकडून सुचना करण्यासाठी सिमला व्हेरिफाय केले नाहीतर त्या सिमला 60  दिवसाच्या आत बंदचे आदेश दिला जाईल. जर सब्सक्राइबर इंटरनॅशनल रोमिंग, आजारी आणि अपंग व्यक्तींना 30 दिवसाचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. जर लॉ इन्फोर्समेंट एजन्सीकडून अथवा बँक, अन्य वित्तीय संस्थेकडून मोबाइल नंबर विरोधात तक्रार मिळाल्यास सिमची आउटगोइंग कॉलला 5 दिवसाच्या आत बंद करण्यात येणार आहे. तसेच इनकमिंग दहा दिवसासाठी बंद होईल. सिम पूर्ण 15 दिवसात बंद करण्यात येणार आहे.

 

सिम कार्ड बंद करण्याचा आदेश –
दूरसंचार विभागाने (DoT) मागील बुधवारी 9 हून अधिक सिम ठेवणाऱ्या मोबाइल यूजर्सला (Mobile users) लवकर व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिलेत.
नियमांनुसार, एक यूजर अधिकाधिक 9  सिम कार्ड खरेदी करू शकतो.
मात्र, जम्मू काश्मीर आणि आसाम सह पूर्वोत्तर राज्यासाठी अधिकाधिक 6 सिम कार्ड ठेवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

 

Web Title :- SIM Cards New Rule | sim cards dot to deactivate extra sim of subscribers beyond 9 connections know details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Crime News | धक्कादायक ! विष प्राशन करुन बँक कर्मचारी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या, 7 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; सुसाईट नोटमध्ये असं लिहिलं की…

Pune Crime | दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने कटरने वार करुन खूनाचा प्रयत्न ; पुणे स्टेशन समोरील घटना

Gold Price Today | खुशखबर! सोने-चांदीच्या किमतीमध्ये कमालीची घसरण, विक्रमी स्तरापासून मिळतेय 8000 रूपयांनी स्वस्त

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News