सिमांचल एक्सप्रेस रुळावरुन घसरली ; ७ जणांचा मृत्यू

पाटना : वृत्तसंस्था – बिहारच्या हाजीपूरजवळ सिमांचल एक्सप्रेस रुळावरुन घसरली आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत.

बिहारच्या वैशाली जिल्ह्यामधील हाजीपूरजवळ पहाटे ४ वाजता हा अपघात झाला असून या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यु झाला आहे. तर १२ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहे.

जोगबनी – आनंद विहार टर्मिनल दरम्यान धावणारी सिमांचल एक्सप्रेसचे ९ डबे रुळावरुन घसरले. या अपघातातील एसी कोचचे मोठे नुकसान झाले आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. तसेच २ एक्स्प्रेसही बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळावर मदत कार्य सुरु झाले असून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या अपघाताची दखल घेऊन अधिकाऱ्यांना जातीने मदत कार्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.