‘सिमी’चा माजी अध्यक्ष शाहिद बद्रला आझमगडमधून अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरात पोलिसांना मोठे यश आले असून त्यांनी स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमीचा माजी अध्यक्ष शाहिद बद्र याला अटक केली आहे. त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुजरातच्या भूजमधील न्यायालयाने अटक वारंट बजावले होते. त्यानंतर गुजरात पोलीस गेले अनेक दिवस त्याच्या मागावर होते.

उत्तरप्रदेशमधील आझमगडमध्ये देखील त्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचबरोबर भूजमध्ये 2012 मध्ये त्याच्या नावावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे अनेक खटल्यांत पोलिसांना तो पाहिजे होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझमगडमधील त्याच्या गावातून त्याला अटक करण्यात आली.

या विषयी बोलताना शाहिद म्हणाला कि, मी सिमीचा अध्यक्ष होतो, त्याचबरोबर माझ्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद असून हि सुप्रीम कोर्टात आणि हाय कोर्टात लढत आहे. त्याचबरोबर सर्व गुन्ह्यांमध्ये मी न्यायालयात हजेरी लावली असून हे वारंट कधी बजावण्यात आले याची माहिती नसल्याचे त्याने सांगितले. त्याचबरोबर शाहिदच्या कुटुंबियांना देखील याविषयी काहीही माहिती नसून सिमीवर प्रतिबंध घालण्यात आल्यानंतर त्याच्या नावाचा वापर करून कोणत्याही कारवाया झालेल्या नाहीत.

दरम्यान, आझमगडचे अधीक्षक पंकज पांडे यांनी सांगितले कि, त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असून गुजरात पोलिसांनी कलम 353 / 143 ,147 यांच्यांतर्गत त्याला अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –