Simrat Kaur | ‘गदर 2’ चित्रपटातील अभिनेत्री सिमरत काम नसल्यामुळे गेली होती डिप्रेशनमध्ये; तेव्हाचा अनुभव गेला शेअर

पोलीसनामा ऑनलाइन – Simrat Kaur | बॉलीवुडच्या आगामी ‘गदर 2’ (Gadar 2) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तारा सिंह आणि सकिना अर्थात अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘गदर 2’ चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस (Gadar 2 Release Date) येणार आहे. यामध्ये सनी, अमिषा सोबतच अभिनेत्री सिमरत कौरने (Simrat Kaur) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. सिमरत हिने अनेक वर्षांपासून चित्रपट विश्वात कार्यरत असली तरी तिला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. सिमरतने तिला काम मिळत नसल्याने ती डिप्रेशन मध्ये गेली होती असे जाहीर केले आहे.

अभिनेत्री सिमरत कौर हिने याआधी तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याचबरोबर सिमरतने ‘डर्टी हरी’ या चित्रपटामध्ये (Dirty Hari Movie) देखील काम केले होते. यामध्ये तिने अनेक इंटिमेट सीन (Simrat Kaur Intimate Scene) व बोल्ड सीन दिले आहेत. प्रेक्षकांनी तिला यावरुन ट्रोल देखील केले. मात्र चित्रपट मिळवण्यासाठी सिमरत खूप प्रयत्न करुनही तिच्या हाती अपयश येत होते. तिच्या करिअरमुळे ती खूप नैराश्यामध्ये (Simrat KaurI In Depression) गेली होती. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिमरतने ती काम न मिळत असल्यामुळे ती डिप्रेशन मध्ये गेली होती. यावेळी तिच्या आई वडिलांनी तिला खूप समाजवले असे सांगितले आहे.

अभिनेत्री सिमरत कौर म्हणाली की, “अभिनेत्री झाल्यानंतर मला समजले की इथे चांगल्या रोलची खूप वेळ वाट पाहावी लागते. खूप संघर्ष करावा लागतो आणि तुम्ही बाहेरचे असाल तर हा संघर्ष जास्त करावा लागतो, त्यामुळे धीर धरावा लागतो. कोणतेही काम सहजासहजी मिळणार नाही हे मान्य करावेच लागेल. मी जेव्हा मनोरंजन विश्वात आले तेव्हा मला माहिती नव्हते की सुरुवात कशी करावी. म्हणून मी दाक्षिणात्य चित्रपटापासून सुरुवात केली. माझ्या डायरेक्टरशी मिटिंग व्हायच्या. सगळे माझे कौतुक करायचे पण मला काम मिळत नव्हते. त्या चर्चेतून मला पुढे काहीच काम मिळायचे नाही. यावेळी मी बॉलीवुडमध्ये देखील काम मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मला दोन्ही सिनेविश्वात कामं मिळतं नव्हती.”

सिमरत कौर (Simrat Kaur) पुढे म्हणाली की, “मी हारले होते. मी परिस्थिती शरण गेले होते.
मी स्वतःला फेल समजायला लागले होते. आणि या सगळ्यामुळे मी नैराश्यामध्ये गेले होते.
डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे मी मला एका खोलीत बंद करुन घेतलं होतं. याव परिस्थितीमध्ये मी खूप रडले आहे.
पण या कठीण काळात मला माझ्या आई वडिलांनी खूप सांभाळून घेतले आणि समजून सांगितले.
मला त्यांनी सांगितले होते की यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत तर करावीच लागणार .
त्याच्या या बोलण्याने माझे मनोबल वाढले. त्यानंतर मी स्वतःवर काम करायला सुरुवात केली आणि ती वेळ आलीच
जेव्हा मला ‘गदर 2’ चित्रपटाची ऑफर मिळाली”


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Late MLA Mukta Tilak | आमदार स्व.मुक्ता टिळक यांच्या जयंतीनिमित्त कर्करुग्णांवर मोफत उपचार व तपासणी शिबिराचे 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन

Pune Police News | हडपसर पोलिसांकडून अल्पवयीन मुलांसाठी मार्गदर्शन शिबीर

Jailer Movie | रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटानिमित्त चेन्नई शहर सजलं; सर्वत्र लागलेत पोस्टर