‘सिंगर’ मुकेश यांनी बहिणीच्या लग्नात गाणं गायलं अन् नशीब ‘फळफळलं’ ; ‘अशी’ मिळाली बॉलिवूडमध्ये संधी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिंगर मुकेश यांचा जन्म 22 जुलै 1923 रोजी लुधियानातील जोरावर चंद माथुर आणि चांद रानी यांच्या घरी झाला होता. आपल्या मधुर आवाजाने आणि गाण्यांनी त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली. 60 आणि 70 दशकात त्रिमुर्तीमध्येही त्यांचा समावेश आहे. यात बाकी दोन सिंगर आहेत किशोर आणि रफी. मुकेश यांच्या वाढदिवशी त्यांच्या आयुष्यातील काही रोचक किस्से जाणून घेणार आहोत.

अशी मिळाली सिनेमात गाण्याची संधी

मुकेश यांची मोठी बहिणदेखील संगीताचं शिक्षण घेत होती. मुकेश मोठ्या उत्साहाने तिला ऐकत असत. त्यांचे एक दूरचे नातेवाईक होते त्यांचं नाव आहे अभिनेता मोतीलाल. मुकेश यांचं करिअर बनवण्यासाठी मोतीलाल यांचं मोठं योगदान आहे. मुकेश आपल्या बहिणीच्या लग्नात गाणं गात होते. या कार्यक्रमात मोतीलालही होते. मोतीलाल मुकेश यांच्या आवाजाला खूपच प्रभावित झाले. मोतीलाल मुकेशला मुंबईत घेऊन गेले. आपल्या घरी रहायला जागाही दिली. त्यांच्यासाठी संगीत रियाजाचीही सोय करण्यात आली.

राज कपूरचा आवाज म्हणून लोक ओळखू लागले

कही दूर जब दिन ढल जाए, किसी की मुस्कराहटों पे हो निसार, सजन रे झूठ मत बोलो, मेरा जूता है जपानी, दोस्त दोस्त ना रहा आणि एक प्यार का नगमा है यांसारखे अनेक सुपरहिट गाणे मुकेश यांनी गायले आहेत जे आजही खूप प्रसिद्ध आहेत. मुकेश यांनी राज कपूर यांच्या इतक्या सिनेमांना आवाज दिला आहे की, त्यांना राज कपूरच्या आवाजाने लोक ओळखू लागले. राज कपूर यांना जेव्हा मुकेश यांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा त्यांच्या तोंडातून आवाजही निघाला नाही. असं वाटत होतं जस काय राज त्यांचंच जीवन कोणी हिरावून घेतलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत बोलताना राज म्हणाले होते की, मुकेश यांच्या जाण्याने माझा आवाज आणि आत्मा दोन्ही गेले आहेत.

असा घेतला जगाचा निरोप

राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम मधील चंचल निर्मल शीतल यास गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण केल्यानंतर मुकेश अमेरिकेतील एका काँसर्टमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेले होते. तिथेच 27 ऑगस्ट 1976 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

आरोग्यविषयक वृत्त –