Sinhagad Road Flyover | पुणेकरांसाठी खुशखबर ! कात्रज चौक आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी; उड्डाणपुलाचे भुमिपूजन नितीन गडकरींच्या हस्ते (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Sinhagad Road Flyover | कात्रज चौकातील (Katraj Chowk) वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येणारा उड्डाणपुल आणि सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे (Sinhagad Road Flyover) भुमिपूजन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि. २४) होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

 

याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane) आणि माजी आमदार योगेश टिळेकर (Former BJP MLA Yogesh Tilekar) उपस्थित होते.
टिळेकर यांनी सांगितले, की कात्रज चौक तसेच कात्रज- कोंढवा रस्त्यावरील (Katraj-Kondhwa Road) वाहतुकीचा प्रश्‍न जटील आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी 2015 पासून पाठपुरावा करत होतो.
कात्रज येथे उड्डाणपुल करण्यात आला आहे, मात्र सातारा रस्त्याला जेथे हा पुल जोडला जातो तेथील भूसंपादनातील अडचणीमुळे समस्या अद्यापही तशीच होती.
दरम्यानच्या काळात, आमदार असताना देहूरोड – कात्रज बाह्यवळण मार्ग (Dehuroad-Katraj Bypass) सरळ कात्रज-कोंढवा रोडला जोडून तो राष्ट्रीय महामार्ग (National Highway) म्हणून जाहीर करावा, यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले.
याला यशही आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाह्यवळण मार्गाला सरळ जोडल्या जाणार्‍या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याने मार्ग मोकळा झाला.

यानंतर कात्रज- कोंढवा सहा पदरी रस्त्याचे कामही सुरू झाले. नवीन उड्डाणपुल (New Flyover)
वंडरसिटी (wonder city) येथून राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या (rajiv gandhi zoological park) एका कोपर्‍यातून थेट राजस सोसायटी (rajas society katraj) चौकापर्यंत करण्यात येणार आहे.
त्यामुळे कात्रज चौकातील वाहतूक कोंडीही कमी होणार आहे.

 

तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी दिली असून
महापालिकेनेही उद्यानाच्या जागेत पुलाचे पिलर उभारण्यास परवानगी दिली आहे.

 

 

 

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे (Sinhagad Road Flyover) या मार्गावरील अगदी खडकवासल्यापर्यंतच्या (khadakwasla) नागरिकांचा वेळ
वाचणार असून वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

 

 

सर्वसाधारण सभा मंजुरी देईल या भरवशावर वर्क ऑर्डर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुर

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला तीन महिन्यांपुर्वी स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
परंतू उड्डाणपुलाच्या कामासाठी पुरेसा निधी नसल्याने पुढील अंदाजपत्रकामध्ये (PMC Budget)
आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी (Pune Corporation) सर्वसाधारण सभेपुढे
(General Body Meeting) प्रलंबित राहीला आहे.
त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून या पुलाच्या कामाची वर्कऑर्डरच दिलेली नाही.
दरम्यान, आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये आर्थिक तरतूदीच्या प्रस्तावाला सर्वसाधारण
सभा मंजुरी देईल या भरवशावर संबधित ठेकेदाराला वर्कऑर्डर द्यावी.
असा प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजुर करण्यात आला अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

 

Web Title : Sinhagad Road Flyover | Good news for Punekars! The problem of traffic congestion on Katraj Chowk and Sinhagad road has been resolved; Bhumipujan of the flyover by Nitin Gadkari Gadkari

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Solapur Crime | करमाळा बलात्कार प्रकरणात मनोहर भोसलेला तब्बल ‘एवढया’ दिवसाची पोलिस कोठडी

Devendra Fadnavis | मुश्रीफांच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार, म्हणाले – ‘आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत’

Maharashtra Rains | आगामी 3 दिवसात मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस ‘कोसळणार’ !