Devendra Fadnavis | मुश्रीफांच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार, म्हणाले – ‘आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत’

गोवा : वृत्तसंस्था –  Devendra Fadnavis | भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) आज सकाळी कराड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला. आरोपानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावत भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच, भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती, असं मुश्रीफ म्हणाले होते. यावर चंदक्रांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. आता मुश्रीफांच्या आरोपानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. मात्र, फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईवरही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणी दिली मुश्रीफांना ऑफर? आम्ही असं ऑफर घेऊन फिरत थोडी असतो. असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कोणालाही द्यायला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल, जो एखादा व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसात निघाला असताना पोलीस त्याला अडवितात, त्याला घरात कोंडून ठेवतात. हे तर ठोकशाहीचच सरकार आहे. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढं बोलताना फडणवीस म्हणाले की, स्वतंत्र भारतात अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था पाहायला मिळाली नाही. महाराष्ट्रात तर नाहीच नाही.
हे खूपच भयानक असून आम्ही किरीट सोमय्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत.
एक व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात. यासाठी कारण सांगितलं जातं की, तिथे ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे.
त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही.
एकूणच जे काही चाललं आहे, ते भयानक आहे.
पण भाजप काही थांबणार नाही. सातत्यानं भ्रष्टाचाराविरोधातील लढाई भाजप लढत राहिल.

 

दरम्यान पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना कारवाईबाबत काही माहित नसेल.
ही कारवाई थेट गृहमंत्र्यांनी केली असेल. पण माझं मत असं आहे की, मुख्यमंत्र्यांना कळाल्यानंतर त्यांनी दखल घेऊन अशी कारवाई थांबवली पाहिजे होती.
असं देखील फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis reaction on hasan mushrif bjp offer sensational statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Rains | आगामी 3 दिवसात मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस ‘कोसळणार’ !

Jalgaon Crime | दुर्देवी ! जळगाव जिल्ह्यात 4 जणांचा बुडून मृत्यू; सख्खे भाऊ आणि चुलत भाऊ-बहिणीचा समावेश

Chandrakant Patil | ‘मुश्रीफ यांनी ड्रामा बंद करावा’ – चंद्रकांत पाटील