दिवाळीत PNB ग्राहकांसाठी खुशखबर ! कर्जावर व्याजदर कमी करून 6.50% केला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  जर तुम्ही पब्लिक सेक्टरच्या पंजाब नॅशनल बँक म्हणजे पीएनबीचे (PNB) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. पीएनबीने (PNB) बुधवारी कर्जावरील व्याज 0.05 टक्के कमी करून 6.50 टक्के केले. पीएनबीने शेयर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, रेपोसंबंधी व्याजदर म्हणजे आरएलएलआर (Repo Linked Lending Rate) 8 नोव्हेंबरपासून 6.55 टक्केवरून कमी करून 6.50 टक्के केला आहे. आरएलएलआरमध्ये घट केल्याने होम, कार, शिक्षण, पर्सनल लोनसह सर्व कर्ज स्वस्त होतील.

 

17 सप्टेंबरला कमी केले होते व्याजदर

 

विशेष म्हणजे PNB बँकेने मागच्यावेळी 17 सप्टेंबरला आपले रेपो आधारित व्याज 6.80 टक्केवरून कमी करून 6.55 टक्के केले होते.

 

PNB Q2 Results : नफा 78 टक्के वाढून 1,105 कोटी

 

अलिकडेच पीएनबीने चालू आर्थिक वर्ष (2021-22) च्या दुसर्‍या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले होते. बँकेचा चालू आर्थिक वर्ष जुलै-सप्टेंबर तिमाहीचा शुद्ध लाभ 78 टक्के वाढून 1,105 कोटी रुपयांवर पोहचला. बँकेने शेयर बाजाराला पाठवलेल्या माहिती सांगितले होते की, याच्या मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या दरम्यान 620.81 कोटी रुपयांचा निव्वळ लाभ कमावला होता. तर सप्टेंबर 2021 ला समाप्त तिमाहीत बँकेचे एकुण उत्पन्न कमी होऊन 21,262.32 कोटी रुपये राहिले, जे याच्या मागील आर्थिक वर्षाच्या समान तिमाहीत 23,279.79 कोटी रुपये होते.

 

बँकेचा संचालन लाभ सुद्धा जुलै-सप्टेंबर 2021 च्या दरम्यान कमी होऊन 4,021.12 कोटी रुपये राहिला, जो याच्या मागील आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत 5,674.91 कोटी रुपये होता. रिपोर्टिंग तिमाहीदरम्यान पीएनबी बँकेची एनपीए (NPA) किरकोळ प्रकारे वाढून 13.63 टक्के झाला. तो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 13.43 टक्के होता.

 

Web Title : PNB | diwali loan offer pnb cuts home auto other loan rates check details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Petrol Diesel Rate | 9 राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या, ठाकरे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

Taapsee Pannu | ‘बॉलिवडूचे अनेक अभिनेते माझ्यासोबत…’, अभिनेत्री तापसी पन्नूचे अत्यंत खळबळजनक वक्तव्य

Pune Crime | ‘दृश्यम’ स्टाईल पत्नीच्या प्रियकरचा काढला काटा, मृतदेह जाळला हातभट्टीत; पुण्यातील धक्कादायक घटना