बसून राहणाऱ्यांचा लवकर होतो मृत्यू, दिवसात शरीराच्या व्हाव्या लागतात ‘एवढ्या’ हालचाली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॉर्वेतील ऑस्लो येथील ‘नॉर्वेजियन स्कूल ऑफ स्पोर्ट सायंसेजचे प्रोफेसर उल्फ एकेलुंड यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी मृत्यू व हालचाल यावर अभ्यास केला. यासाठी त्यांनी एक्सेलेरोमीटरचा वापर केला. हे एक असे उपकरण आहे जे जागेपणी आणि झोपलेले असतानाही हालचालींचे प्रमाण आणि तीव्रतेचा अभ्यास करते.

दिवसभर साडे नऊ तासांपासून अधिक काळ बसून राहणाऱ्या लोकांना मृत्यू लवकर गाठतो असा अहवाल ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) ने प्रसिद्ध केला आहे. एका वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. यासाठी संशोधकांनी ४० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ३६ हजारांहून अधिक लोकांचा अभ्यास केला. यांचे सरासरी वय ६२ वर्षे होते. या सर्वांच्या हालचालीवर सरासरी ५.८ वर्षे नजर ठेवण्यात आली.

संशोदनासाठी निवडण्यात आलेल्या २१४९ लोकांचा मृत्यू झाला यात त्यांना असे आढळून आले की, शाररिक हालचाली कमी करणाऱ्यांना मृत्यू लवकर गाठतो. आणि जे लोक पाच तासांहून अधिक काळ हालचाली करतात त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

कोणतेही शरिरीक परिश्रम न करणाऱ्यांचा मृत्यू लवकरच झाल्याचे आढळून आले. वयोमर्यादेनुसार १८ ते ६४ वर्षे वयोगटातील लोकांनी आठवडाभर १५० मिनिट मध्यम किंवा ७५ मिनिट कठोर परिश्रम करायला हवेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like