Skin Care Tips | चेहरा साफ करताना अनेकदा लोक करतात या 5 चुका , त्वचेसाठी नुकसानदायक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Skin Care Tips | प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावे असं कायम वाटत असते. चेहरा सुंदर (Beautiful Face) दिसण्यासाठी लोक त्वचेची खूप काळजी घेतात. अनेक उपाय योजना करतात, परंतु असे असूनही त्यांच्या त्वचेवर मुरुम, सुरकुत्या यासारख्या समस्या वाढतच जातात. जर आपण या समस्यांच्या मुळाशी गेलो तर आपल्या लक्षात येईल की आपल्याच छोट्या छोट्या चुका त्यांना कारणीभूत आहेत. आपल्या सर्वांची त्वचा वेगळी आहे, काहींची सेन्सिटिव्ह (Sensitive) काहींची कॉम्बिनेशन (Combination) तर काहींची तेलकट (Oily) आणि अनेक वेळा आपण नकळत अशी उत्पादने त्वचेवर वापरतो (Skin Care Tips) जी आपल्या त्वचेला शोभत नाहीत आणि ते दुष्परिणाम दाखवतात. (Avoid These Mistakes While Washing Your Face)

 

स्क्रबिंग (Scrubing ) करून चेहऱ्यावरचे डेड सेल्स (Dead Cells) निघून जातात पण जास्त स्क्रब केल्याने चेहऱ्यावर दुष्परिणाम दिसू लागतात. शरीरापेक्षा चेहऱ्यावरची त्वचा नाजूक असते. जास्त स्क्रबमुळे त्वचेचे निर्जलीकरण (Dehydration) होऊ लागते आणि पांढरे दाग दिसू लागतात. त्यामुळे स्क्रबींग आठवडयातून एकदाच करावी आणि इतर दिवशी व्यवस्थित चेहरा साफ करावा, डेड स्किन पासून तर सुटका होईलच पण त्वचा जास्त निरोगी आणि मऊ बनेल. (Skin Care Tips)

 

चेहरा धुताना टाळा या चुका
अति गरम पाण्याने चेहरा साफ करणे

चेहऱ्याची त्वचा नाजूक असते, आणि जास्त गरम पाण्याने साफ केल्यास त्वचेतील चमक नाहीशी होऊ लागते. लवकर सुरकुत्या पडू लागतात. त्वचा कोमलपणा गमवू लागते. त्यामुळे साध्या पाण्याने, किव्वा हिवाळ्यात हलक्या कोमट पाण्याने चेहरा साफ करावा.

एकाच टॉवेलने शरीर आणि चेहरा पुसणे
खरं तर, सामान्य घरांमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्ही एकाच टॉवेलने शरीर आणि चेहरा स्वच्छ केला तर ते तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी चांगले नाही. यामुळे टॉवेलमध्ये असलेले बॅक्टेरिया तुमच्या चेहऱ्यावर येतात आणि त्वचेवर डाग आणि पिंपल्स येऊ शकतात.

खूप थंड पाण्याने चेहरा साफ करणे
जर तुम्ही खूप थंड पाण्याने (Cold Water) चेहरा धुतलात तर त्वचेची छिद्रे साफ होत नाहीत आणि त्यामुळे चेहऱ्यावर घाण जमा होऊ लागते जी नंतर मुरुमांचे कारण बनते.

 

त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश न निवडणे
आजकाल लोक जाहिरात पाहून किंवा सुगंध आवडल्यानंतर फेस वॉश (Face Wash) विकत घेतात आणि ते चेहऱ्यावर वापरण्यास सुरुवात करतात.
पण असे केल्याने त्वचेला जास्त नुकसान होते. म्हणूनच, नेहमी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश निवडा आणि वापरा.
बेसन, दही, खोबरेल तेल इत्यादी नैसर्गिक गोष्टींनी चेहरा स्वच्छ केलेला कधीही चांगलाच.

मेकअप सोबतच चेहरा धुणे
कायम मेकअप क्लिनरने मेकअप स्वच्छ केल्यानंतरच चेहरा पाण्याने धुवा.
जर तुम्ही मेकअप न उतरवता फेसवॉश करत असाल तर मेकअपचे पदार्थ नीट उतरणार नाहीत आणि त्यातील रसायने चेहऱ्याच्या त्वचेला खराब करतात.

 

रोज रोज केमिकल पदार्थ चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला खेळती हवा मिळत नाही.
आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा जास्त दिवस निरोगी आणि फ्रेश राहणार नाही.
रात्री झोपताना व्यवस्थित मेकअप क्लिनर ने मेकअप उतरवावा आणि आपल्या चेहऱ्याला सूट होणारे मॉइश्चरायझर आणि टोनर लावावे.

 

या काही टिप्स चा उपयोग करून आपण आपल्या त्वचेला निरोगी आणि प्रॉब्लेम फ्री ठेवू शकतो.

 

Web Title :- Skin Care Tips | avoid these mistakes while washing your face skin care

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EWS Reservation | EWS आरक्षण उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपये कायम, केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

 

Housing Sales Report | 2021 मध्ये पुण्यासह देशातील ‘या’ 7 टॉप शहरांत घरांची विक्री 71% वाढली, पुण्यात 53 % वाढ; ‘एनारॉक’च्या रिपोर्टमध्ये दावा

 

India’s Top 10 Companies | ‘या’ आहेत भारतातील टॉप 10 कंपन्या, 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी उसळी