Skin Infection In Monsoon | पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनमुळे त्रस्त आहात का? मुक्त होण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

नवी दिल्ली : Skin Infection In Monsoon | पावसाळ्यात वातावरण आल्हाददायक असले तरी अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबून अनेक आजारही फोफावू लागतात. अशावेळी अनेकांना स्किन आणि फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) होते. (Skin Infection In Monsoon)

 

पावसात भिजल्यामुळे किंवा जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे, फंगल इन्फेक्शन होते. या समस्येमुळे, आपण कधीकधी अस्वस्थ होतो. अनेकदा ही समस्या वाढू लागते.

 

यासाठी, पावसाळ्यात काही बदल करणे आवश्यक आहे, जेणेकरुन स्किन इन्फेक्शन टाळता येईल.

१. शरीर व्यवस्थित कोरडे करा

आद्र्रतेमुळे त्वचेवर फंगस जमा होते. यासाठी पावसात भिजल्यानंतर आणि शॉवर घेतल्यानंतर शरीर पूर्णपणे कोरडे करा. शरीराचे सर्व भाग पूर्णपणे कोरडे केल्याने फंगलपासून मुक्ती मिळेल.

 

२. हलके-आरामदायी कपडे

पावसाळ्यात कॉटन आणि लिनेन सारखे फॅब्रिकचे कपडे घालणे चांगले. जेणेकरून त्वचेला श्वास घेण्यास जागा मिळेल. सैल आणि हलके कपडे घाला जेणेकरून हवा आत जाऊ शकेल. असे कपडे शरीर कोरडे ठेवतात.

 

३. पर्सनल हायजीन

फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी पर्सनल हायजीन अत्यंत आवश्यक आहे. हात साबणाने चांगले धुवा. टॉवेल स्वच्छ ठेवा. अंडरगारमेंट नीट धुऊन कोरडे केल्यावरच परिधान करा. पावसाळ्यात इन्फेक्शन टाळण्यासाठी नखे कापा.

 

४. अँटीफंगल पावडर

फंगल इन्फेक्शन झाले असेल तर अँटी फंगल इन्फेक्शन पावडर वापरू शकता. यामुळे त्वचा कोरडी राहील. फंगसची उत्पत्ती होणार नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचा आणि शरीर आतून निरोगी राहील.

 

Web Title :  Skin Infection In Monsoon | monsoon-tips-are-you-troubled-due-to-skin-infection-during-rainy-days-
follow-these-easy-tips-to-get

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा