Pune Crime News | चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणार्‍या गुन्हेगारावर MPDA कायद्यान्वये कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा आणि बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या आणि चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या (Chaturshringi Police Station) हद्दीत दहशत माजविणार्‍या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. (Pune Crime News)

 

शुभम उर्फ ताया सुनिल दुबळे Shubham Alias Taya Sunil Duble (21, रा. फ्लॅट नं. 403, चिंतामणी सोसायटी, मानाजी नगर, गणपती माथ्या जवळ, नर्‍हे, पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. दुबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Records) आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी हत्यार, तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लाकडी बॅट या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्याविरूध्द 5 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Crime News)

चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr. PI Balaji Pandhare) यांनी शुभम दुबळेवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत पाठविला होता. गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) पीसीबीचे पोलिस निरीक्षक चंदक्रांत बेदरे (PI Chandrakant Bedre) यांनी तो प्रस्ताव पुढे पाठविला. प्रस्तावाची छाननी करून पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुभम दुबळे याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करत त्यास 1 वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) स्थानबध्द केले आहेत.

 

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 29 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अया प्रकारची कारवाई सराईत गुन्हेगारांवर करण्यात येणार आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Action under MPDA Act against the criminal
who created terror in Chathushringi police station limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा