Sleep Quality | बिछान्यावर पडताच सेकंदात येईल गाढ झोप, अवलंबा ‘या’ 5 नॅचरल टिप्स; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – Sleep Quality | असे अनेक लोक आहेत ज्यांना झोप न येण्याच्या समस्येला (Insomnia Problem) सामोरे जावे लागते. झोपेच्या कमतरतेमुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो (Bad Health Effects Due To Lack Of Sleep). यामुळे लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित समस्या, उच्च रक्तदाब (Obesity, Heart Problems, Hypertension) अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. झोपेसाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात, पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही नैसर्गिक टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची स्लीप क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. या नैसर्गिक टिप्स जाणून घेवूयात (Sleep Quality) –

 

स्लीप क्वालिटी सुधारण्यासाठी नॅचरल टिप्स (Natural Tips To Improve Sleep Quality) :

 

1. खोलीचे तापमान सेट करा – (Set Room Temperature)

झोपताना, तुमच्या खोलीचे तापमान खूप थंड किंवा खूप गरम नसावे याची काळजी घ्या. कारण यामुळे तुम्हाला गरम होऊ शकते. अशा स्थितीत खोलीचे तापमान मध्यभागी ठेवा जेणेकरून रात्री झोपेत त्रास होणार नाही (Sleep Quality).

 

2. फुट मसाज – (Foot Massage)

चांगल्या झोपेसाठी, रात्री झोपण्यापूर्वी फुट मसाज म्हणजेच पायाची मालिश करणे खूप फायदेशीर ठरू शकते. मसाज करताना तुम्ही कॅमोमाईल तेल देखील वापरू शकता. कॅमोमाईल तेलाने मसाज केल्याने आराम वाटतो, ज्यामुळे चांगली झोप मिळू शकते. हे स्लीप क्वालिटी सुधारण्यास देखील मदत करते.

 

3. इसेन्शियल ऑईल – (Essential Oil)

अशी अनेक इसेन्शियल ऑईल आहेत जी तुम्हाला आराम करण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी खोलीतील डिफ्यूझरमध्ये इसेन्शियल ऑईल ठेवू शकता. यामुळे तुमची एंग्जायटी लेव्हल पातळी कमी होते आणि मूड देखील चांगला राहतो, तसेच झोप येण्यास मदत होते. लव्हेंडर तेल वापरू शकता.

 

4. फोन दूर ठेवा – (Keep The Phone Away)

बहुतेक लोक रात्री झोपताना फोन वापरतात. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोक झोपण्यापूर्वी तासन्तास फोन वापरतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे झोपेच्या गुणवत्तेवर खूप वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, झोपण्याच्या एक तास आधी फोन वापरू नये.

 

5. पुस्तक वाचा – (Read Book)

रात्री झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक वाचले तर झोप लवकर येते. पण लक्षात ठेवा की ई-बुक्स वाचू नका. फोनमधून निघणार्‍या ब्ल्यू लाईन्स मेलाटोनिनच्या लेव्हलवर खूप वाईट परिणाम करतात.

6. पाऊस आणि समुद्राच्या लाटांचा आवाज – (The Sound Of Rain And Sea Waves)

अनेकदा तुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता जेथे समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो किंवा पाऊस पडत आहे, अशा ठिकाणी चांगली झोप येते.

 

पण जर झोप येत नसेल तर तुम्ही रोज अशा ठिकाणी जाऊ शकत नाही,
यासाठी झोपण्यापूर्वी यूट्यूबवर पावसाचा आवाज किंवा समुद्राच्या लाटांचा आवाज ऐका.
हे आवाज तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारतात.

 

7. कपड्यांशिवाय झोपणे – (Sleeping Without Clothes)

कपड्यांशिवाय झोपल्याने शरीराचे तापमान योग्य राहते, तसेच त्वचेची गुणवत्ता सुधारते,
असे केल्याने तणावाची पातळी कमी होते आणि हे योनीच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

 

तुम्ही प्रेग्नंसी प्लान करत असताना तुमचा जोडीदारही कपड्यांशिवाय झोपत असेल
तर त्यामुळे फर्टिलिटी लेव्हल (Fertility Level) बुस्ट होते.
काही संशोधनात असे समोर आले आहे की, कपड्यांशिवाय झोपल्याने चिंता कमी होते.
मात्र, बेडशीट कॉटन किंवा सिल्कची असावी हे लक्षात ठेवा.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Web Title :- Sleep Quality | follow these natural tips deep sleep will come in seconds

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा