काय सांगता ! होय, कोकणातील घनदाट जंगलात दुर्मिळ ‘वनमानव’, जाणून घ्या

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – स्लेंडर लोरीस हा अत्यंत दुर्मिळ प्राणी वन्यप्रेमींना आढळून आलाय. रात्रीच्या वेळी हा प्राणी हुबेहूब माणसासारखा दिसत असल्यामुळे त्याला वनमानव म्हटलं जातं. सिंधुदुर्गात आंबोली, केसरी, फणसवडे, तळकट, झोळंबे या गावांच्या आसपासच्या जंगलात आणि तिलारीच्या घनदाट जंगलात काही जणांना आत्तापर्यंत हा प्राणी दिसला आहे. हा प्राणी माकडाच्या प्रजातीतलाच एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. श्रीलंका आणि भारत या दोन देशात याचं मूळ आहे. वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार या प्राण्याचा ‘शेड्यूल वन ‘ म्हणजे अधिसूची क्रमांक एक मध्ये समावेश करण्यात आलाय. मात्र या प्राण्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीची शक्यता असल्यामुळे याचं अचूक स्थान अत्यंत गुप्त ठेवलं गेलं आहे.

दक्षिण भारतात तामिळनाडूत आणि अति पावसाच्या पश्चिम घाटातल्या घनदाट जंगलात या प्राण्याचं अस्तित्व आढळलं आहे. अत्यंत हळु हालचाल करणारा हा प्राणी हुबेहूब एखाद्यापश्चिम घाटा लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला वनमानव म्हटलं गेलय. स्लेंडर लोरिस अर्थात वनमानव जंगलात आढळणे म्हणजे हे जंगल अद्यापही जैवविविधतेने अत्यंत समृध्द असल्याचं उदाहरण आहे.

वनमानवाच्या तस्करीचं काय आहे कारण
या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचा प्रत्येक अवयव हा अत्यंत औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज आहे. तसंच जादूटोणा, करणी, जारण मारण यासाठी तांत्रिक मांत्रिकांकडून या प्राण्याला मोठी मागणी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्लेंडर लोरिसला आंतरराष्ट्रीय तस्करीचा धोका आहे. तामिळनाडूत अशाच प्रकारे या प्राण्याची तस्करी आणि शिकार झाल्यामुळे झपाट्याने याची प्रजाती कमी झाली आहे. म्हणून या प्राण्याचं सरंक्षण करण्यासाठी वन्यजीवप्रेमी आणि वनविभागाकडून अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे.

तिलारी परिसर अभयारण्य करण्याची गरज
सिंधुदुर्गातल्या ज्या तालुक्यात हा स्लेंडर लोरिस आढळलाय तो दोडामार्ग तालुका हा भारत सरकारने नेमलेल्या कस्तुरीरंगन समितिने इकोसेन्सिटीव्ह झोन मधून वगळलाय. समृध्द जैवविधता, मुबलक पाणी आणि घनदाट जंगल असल्यामुळेच या भागात अनेक जंगली प्राण्यांप्रमाणेच वाघही आहेत. मात्र तिलारीच्या एकूण जंगलसंपदेपैकी फक्त २८ चौरस किलोमीटरचं जंगल वनविभागाच्या मालकीच आहे आणि उरलेलं म्हणजे जवळपास ९५ % जंगल खाजगी मालकीचं आहे. म्हणून अभयारण्य करण्यात अडथळे आहेत. त्यामुळे हा परिसर अभयारण्य करावा अशी मागणी होउ लागली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?