परदेशी महिलेच्या अंतर्वस्त्रातून तस्करीचे सोने जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

दोन कोटी रुपयांच्या गोल्ड बारसह चार प्रवाशांना मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यात दोन परदेशी महिलांचा समावेश असून या तिन्ही घटनेत या अधिकार्‍यांनी सव्वासात किलो वजनाचे गोल्ड बार जप्त केले आहे. या गोल्ड बारची किंमत सुमारे दोन कोटी रुपये असल्याचे कस्टम अधिकार्‍याने सांगितले.

मंगळवारी शारजाह येथून दोन विदेशी महिला आल्या होत्या. या दोघींची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना  अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांनी अंर्तवस्त्रातून गोल्ड बार घेऊन आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या दोघींना या अधिकार्‍यांनी अटक केली.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3fa60175-85c7-11e8-963b-3b50a8a62279′]

नादा अहमद मोहम्मद ओमेर आणि मनाल ओमर अलहसन मेहमूद अशी या दोघींची नावे असून त्या सुदान देशाच्या नागरिक आहेत. त्यांच्याकडून 1 किलो 399 ग्रॅम वजनाचे बारा गोल्ड बार या अधिकार्‍यांनी जप्त केले असून त्याची किंमत 32 लाख रुपये आहे.

दुसर्‍या घटनेत हाफीज अबदुरुब या प्रवाशाला या अधिकार्‍यांनी अटक केली. ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडत असताना त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्याच्याकडे अधिकार्‍यांनी 1 कोटी 37 लाख रुपयांचे सुमारे पाच किलो वजनाचे गोल्ड बार जप्त केले आहे. त्याच्या चौकशीनंतर शेख इरफान याला अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते.

तिसर्‍या घटनेत दुबईहून मुंबईत आलेल्या स्पायजेट एअरवेजच्या एका सीटमधून लपवून आणलेले 26 लाख 17 हजार रुपयांचे 932 ग्रॅम वजनाचे आठ गोल्ड बार  अधिकार्‍यांनी जप्त केले.