‘या’ कारणामुळे व्हायरल होताहेत ‘JCB की खुदाई’ वर बनलेले मीम्स ,काय आहे याचे सनी लिओनी कनेक्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- तुम्ही पाहिलं असेल सध्या सर्वत्र जेसीबीचे मीम्स व्हायरल होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर हे टॉपवर आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि एके काळची पॉर्न स्टार सनी लिओनी एक फोटो सोशलवर शेअर केला आहे. या फोटोत सनी लिओनी जेसीबी मशीनवर उभी असल्याचे दिसत आहे. यानंतर जेसीबीचे अनेक मीम्स समोर येताना दिसत आहे. यानंतर  #JCBKiKhudayi हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडला असल्याचे दिसून आले.  या फोटोला सनीने खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये सनी म्हणते की, “Career change!? LOL”

https://www.instagram.com/p/Bx4l-Y_B6n_/?utm_source=ig_embed

या फोटोत सनी नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे. फोटो शेअर केल्यानंतर अनेक युजर्सने लिहिलं आहे की, युट्युबवर जेसीबी मशीनच्या खोदण्याच्या साधारण व्हिडीओलाही 10 लाख ते 40 लाख पर्यंत लोकांनी पाहिले आहे. लोकांकडे इतका मोकळा आहे की, ते जेसीबीच्या या व्हिडीओला पाहत आहेत? याचे उत्तर देताना युजर्सने ठिकठिकाणचे फोटो शेअर केले आहेत ज्यात लोक मोठी गर्दी करत जेसीबी मशीनने होणारे खोदण्याचे काम पाहत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, …तर लोकांनी जेसीबीचे खोदकाम पाहणाऱ्या लोकांना ट्रोल करण्यासाठी आता मीम्स बनवायला सुरुवात केली आहे.