तर… भाजप शरद पवारांचा पराभव करेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना भाजप पराभूत करेल असे खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात आमची पक्षात्मक बांधणी मजबूत झाली असल्याने माढा मतदारसंघात शरद पवार उभा राहिले तर भाजप त्यांचा पराभव करेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणाला लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागल्याचे जाणवू लागले आहे.

२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी ३,१४,४५९ मताधिक्य घेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र माढ्यातून जिंकून गेल्या नंतर शरद पवार यांनी मतदारसंघात कमीच फिरकने पसंत केले होते म्हणून त्यांच्यावर त्यावेळी प्रसार माध्यमातून टीका सुद्धा केली जात होती. याला देखील भाजप कडून प्रचाराचा स्थानिक मुद्दा केला जाऊ शकतो. त्याच प्रमाणे शरद पवार उभे राहिल्यास भाजप कडून हि तगडा उमेदवार या मतदारसंघात उतरवला जाईल हे मात्र आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून दिसून येऊ लागले आहे.

दरम्यान जयंत पाटील यांनी शरद पवार लोकसभा निवडणूक लढणार नाहीत असे जाहीर केल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना आपल्या उमेदवारी बद्दलचे मत व्यक्त केले आहे. माढा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी मला या मतदारसंघातून उभा रहा असे म्हणले आहे. त्याच प्रमाणे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हि मी माढ्यातून उमेदवारी करावी म्हणून आग्रह आहे मात्र या बाबत मी विचार करून निर्णय घेईल असे शरद पवार म्हणाले आहेत.