म्हणून आम्ही झालो सत्तेत सहभागी : उद्धव ठाकरे

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

ज्याप्रमाणे भाजपने अन्य राज्यात फोडाफोडी केली तशी भाजपला महाराष्ट्रात करता येऊ नये म्हणूनच गेल्या चार वर्षापासून भाजपवर सातत्याने टीका करणारी शिवसेना सत्तेत सहभागी झाली, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

[amazon_link asins=’B005LTPPBO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4790b65c-8f03-11e8-977a-2bfba8e81a82′]

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी  घेतलेल्या मुलाखतीत २०१४ चा जनमताचा कौल ही जनतेची चूक होती असं वाटतं का आपल्याला? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना उद्धव म्हणाले, नाही असं नाही मी म्हणतो ती जनतेची फसवणूक होती. आणि मी म्हणून म्हणतो की, समजा त्या वेळी आम्ही सत्तेत सहभागी नसतो झालो, ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी राज्ये जिंकत चाललीय. वाट्टेल त्या पद्धतीने जसे त्रिपुरामध्ये काँग्रेस, तृणमूल पक्ष फोडूनच राज्य स्थापन केले, तसे  महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे फोडून त्यांनी आपले राज्य स्थापन केले असते तर पुन्हा आम्ही बोंबलतच राहिलो असतो रस्त्यावर. त्याच्यापेक्षा मी माझ्या लोकांना कारभाराचा अनुभव घेऊ दिला.

या मुलाखतीमध्ये, गुजरातमध्ये पाच हजार शेतकऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. हेच का तुमचे विकासाचे मॉडेल, असा सवाल उपस्थित करत उद्धव यांनी थेट पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. राजकारणात पैशांचा जोर वाढला आहे. हा पैसा कोठून येतोय हे कळले तर इतर राजकीय पक्षांनाही फायदा होईल, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

माझा पक्ष शिवसेनाप्रमुखांनी दुसऱ्याचा पक्ष फोडून स्थापन केलेला नाही. माझा पक्ष रिजनल असला, तरी ओरिजनल आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेवरही भाष्य केले. जो पक्ष माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करुनच स्थापन झाला होता तो पक्ष फुटला म्हणजे नेमकं काय झाले?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

माझ्या पक्षातून गेलेली माणसे नंतर पक्षात परत आली, तर त्यात फोडाफोडी कुठून आली?, असा प्रश्न उद्धव यांनी विचारला. ‘मुळामध्ये जो पक्ष माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करुनच स्थापन झाला होता तो पक्ष फुटला म्हणजे नेमकं काय झाले? जे तुम्ही घेऊन गेला होतात ते माझ्याकडे परत आले असेल तर मी कुठे काय फोडले? विचार तोच, माणसे तीच, नवीन काय केलेत? निर्माण काय केलंत?,’ असे सवाल करत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लक्ष्य केले.