अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण…, आता नाही येत म्हणून…, फडणवीसांवर नेटकरी बरसले

0
86
devendra-f
File Photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीसांनी सुध्दा अधिवेशनात वैधानिक मंडळावरुन उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या अधिवेशनाचा व्हिडिओ सुद्धा फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान फडणविसांचा हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी त्यांनाच ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. एका नेटकऱ्यांने तर अध्यक्ष महोदय…मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं अशा शब्दात फडणवीसांच्या व्हिडिओवर कमेंट दिली आहे.


https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1366293473662406659

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस असून यामध्ये विरोधक आक्रमक झाले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून 72 दिवस झाले तरीही सरकारने वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही असा सवाल करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी फडणवीस आक्रमक झाले असून तुम्ही जर दिले नाही तर संघर्ष करुन मिळवू, ही भीक नाही आहे, आम्ही भिकारी नाही आहोत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले आहे.