जेव्हा सारा अली खानला भिकारी समजून लोकांनी दिले पैसे, खुद्द अभिनेत्रीनंच केला ‘खुलासा’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सारा अली खान कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. पुन्हा एकदा सारा अली खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो वेगानं व्हायरल होत आहे. सारानं एक मजेदार किस्सा सांगितला जेव्हा लोकांनी तिला भिकारी समजून पैसे दिले होते.

साराचा एक व्हिडीओ इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे. साराचा हा थ्रोबॅक व्हिडीओ एका मुलाखतीतला आहे. ही मुलाखत तिच्या डेब्यू सिनेमादरम्यानची असावी. सारा म्हणते, “आम्ही त्यावेळी परदेशात होतो. आई बाबा दोघंही शॉपिंगसाठी आत गेले होते. मी आणि भाऊ दोघं बाहेरच थांबलो होतो. त्यांना यायला वेळ होता. मी अचानकच डान्स करू लागले. तिथल्या लोकांना वाटलं की, मी भिकारीच आहे. त्यांनी मला पैसे दिले.”

पुढे बोलताना सारा म्हणते, “त्यांनी असं का केलं मला नव्हतं माहिती. जेव्हा आई बाब आले तेव्हा मी त्यांना म्हटलं हे बघा मला पैसे मिळाले. तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्या लोकांनी भिकारी समजून तुला हे पैसे दिले आहेत.”

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like